व्यापार चर्चेवरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना सर्वात छान दिसणारी व्यक्ती म्हटले. तसेच त्यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदीसाठी स्वतः मध्यस्थी केल्याचा दावा पुन्हा एकदा केला.
दक्षिण कोरियामध्ये डिनर समारंभात आशिया- पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपेक) च्या व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला व्यापारी दबावाचा वापर करून दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील युद्ध टाळले.
“दोन अण्वस्त्रसज्ज राष्ट्रे एकमेकांशी लढत होती. ते म्हणाले नाही, नाही. तुम्ही आम्हाला लढू द्या. ते बलवान लोक आहेत. पंतप्रधान मोदी हे चांगले दिसणारे आहेत. ते नरकासारखे कठोर आहेत. आणि थोड्या वेळाने त्यांनी फोन केला आणि सांगितले की आपण लढाई थांबवू,” असा दावा ट्रम्प यांनी केला.
“मी भारतासोबत व्यापार करार करत आहे आणि मला पंतप्रधान मोदींबद्दल प्रेम आणि आदर आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत. त्याचप्रमाणे, पाकिस्तानचे पंतप्रधान एक महान माणूस आहेत आणि त्यांचे फील्ड मार्शल एक महान सेनानी आहेत. मी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितले की तुम्ही पाकिस्तानशी लढत आहात म्हणून आम्ही तुमच्याशी व्यापार करार करू शकत नाही. मग मी पाकिस्तानला फोन केला आणि तेच सांगितले,” असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले.
हे ही वाचा :
अल-कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याप्रकरणी इंजिनिअरला अटक
सीमा नियंत्रणाबाबत भारत- चीनमध्ये सक्रिय संवाद सुरू राहणार!
नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या गाझामधील हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू
“भारत- पाकिस्तान संघर्षात सात नवीन, सुंदर लढाऊ विमाने पाडण्यात आली”
या वर्षी मे महिन्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचे ट्रम्प यांनी भूतकाळात असेच दावे केले आहेत, हा दावा नवी दिल्लीने स्पष्टपणे नाकारला आहे आणि दोन्ही देशांमधील युद्धबंदी द्विपक्षीय पातळीवर झाली असल्याचे पुनरुच्चार केला आहे.







