28 C
Mumbai
Sunday, November 16, 2025
घरक्राईमनामाअल-कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याप्रकरणी इंजिनिअरला अटक

अल-कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याप्रकरणी इंजिनिअरला अटक

पुण्यातील कोंढावा परिसरात महाराष्ट्र एटीएसची कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत पुण्यातील कोंढावा परिसरातून एका इंजिनिअरला अटक केली आहे. अल- कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. हंगरकेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र आणि माहिती आढळून आली आहे. जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत आणि त्याने आणखी कोणाला अल- कायद्याचे सदस्य होण्यासाठी माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखोंचे पॅकेज घेतो.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, हंगरगेकरचा अल- कायदाच्या सदस्यांशी संपर्क होता का आणि त्या संपर्काचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. अल- कायदाचे साहित्य का आणि कशासाठी होते, हेही तपासले जात आहे. त्याचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणीही केली जाईल. तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : 

सीमा नियंत्रणाबाबत भारत- चीनमध्ये सक्रिय संवाद सुरू राहणार!

नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या गाझामधील हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू

“भारत- पाकिस्तान संघर्षात सात नवीन, सुंदर लढाऊ विमाने पाडण्यात आली”

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “काबुल भारताचा कठपुतली झालाय!”

माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल- कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले. संबंधित साहित्य डाउनलोड करणे गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. न्यायालयाने जुबेर हंगरगेकरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जुबेर हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा आहे. सध्या तो कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा