28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरदेश दुनियाट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!

ट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!

इराणचा अमेरिकेला इशारा

Google News Follow

पश्चिम आशियातील इराणविरोधातील लष्करी संघर्ष संपण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणविरोधातील लष्करी कारवाई प्रभावीपणे संपली असून पुन्हा मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या विधानानंतर इराणने अमेरिकेला उलट इशारा दिला आहे. युद्ध संपवायचे असेल, तर अमेरिकेने इराणच्या सात अटी मान्य करून शरणागती पत्करावी, अशी मागणी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख मेजर जनरल मोहसेन रेझाई यांनी केली आहे.

रेझाई यांनी इराणी माध्यमांशी बोलताना अमेरिकेवर निशाणा साधला. इराणविरोधातील युद्धामुळे अमेरिकेचे सरकार अडचणीत आले असून, काल्पनिक चर्चांबाबत बातम्या पसरवणे अमेरिकेने थांबवावे, असे त्यांनी म्हटले. तसेच पश्चिम आशियातील बदललेली परिस्थिती स्वीकारून इराणच्या सात अटी मान्य करण्याची वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असल्याच्या दाव्यांनाही त्यांनी फेटाळून लावले.

काय आहेत इराणच्या अटी?

युद्ध संपवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. यामध्ये सर्व आघाड्यांवरील लष्करी संघर्ष थांबवणे, होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरातील अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवणे, या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक तातडीने सुरू करणे, इराणवरील आर्थिक निर्बंध हटवणे, परदेशात गोठवलेली इराणची आर्थिक संपत्ती मुक्त करणे आणि इराणच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे या मागण्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

मोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

‘गोकुळ’ची निवडणूक होणार… स्थगितीची मागणी फेटाळली

डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारला

अटल सेतू – मुंबई पुणे एक्स्प्रेवेला जोडणाऱ्या उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी संघर्ष आता प्रभावीपणे संपल्याचे म्हटले आहे. इराणची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून सध्याची परिस्थिती कायम ठेवण्यावर अमेरिकेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. इराणकडून अमेरिकेशी संपर्क साधला जात असून ते अत्यंत नम्रपणे बोलत असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. त्यामुळे हा संघर्ष लवकर संपण्याची शक्यता असल्याचे त्यांनी संकेत दिले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा