30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियालसीकरणात अमेरिकेची का झाली घसरण?

लसीकरणात अमेरिकेची का झाली घसरण?

Google News Follow

Related

जगातील सर्वात श्रीमंत लोकशाहींमध्ये अमेरिकेचा लसीकरण दर हा सर्वात कमी असल्याने क्रमवारीत घसरण होत आहे. जी ७ देशांमधील जपान सुरुवातीला लसीकरण मोहीम पूर्ण करण्यास मागे पडला होता. मात्र, आता जपानने अमेरिकेला लसीकरणात मागे टाकले आहे. जपानमध्ये नुकतेच लसीचा किमान एक डोस घेतलेल्या लोकसंख्येच्या टक्केवारीत वाढ होऊन जपानने अमेरिकेला मागे टाकले आहे. जपानच्या या यशस्वी वाटचालीमुळे जी ७ या श्रीमंत लोकशाही देशांच्या गटात लसीकरणामध्ये अमेरिका शेवटच्या स्थानावर आहे.

गुरुवारी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ हा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालातील आकडेवारीनुसार जपानमधील लोकसंख्येनुसार ६२.१ टक्के लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. तसेच अमेरिकेतील ६१.९ टक्के लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. अहवालानुसार पूर्ण लसीकरण झालेल्या लोकसंख्येत अमेरिका किंचितश्या फरकाने जपानच्या पुढे आहे. संपूर्ण लसीकरणाच्या दृष्टीने अमेरिका सध्या ब्रिटन, कॅनडा, फ्रांस, जर्मनी आणि इटली यांच्या पाठी सहाव्या स्थानी आहे. मात्र सध्या जपानमध्ये लसीकरणाने वेग पकडला असून त्यामुळे अमेरिका सातव्या स्थानी घसरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

लैंगिक अत्याचाराचा प्रकार वर्षभराने झाला उघड! वाचा…

कधी मिळणार आहे, चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत?

मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

अनिल परबांच्या ‘त्या’ अनधिकृत कार्यालयावर पडणार हातोडा

अमेरिकेमध्ये २४ जुलै ते ९ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण लसीकरणाचा दर साधारण ४ टक्क्यांनी वाढला, तर याच दरम्यान जपानमध्ये हा दर २५ टक्क्यांनी वाढला. जपानमधील नवीन रुग्णसंख्या ही २५ ऑगस्टपासून झपाट्याने खाली आली. जुलै आणि ऑगस्टमध्ये जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमुळे रुग्णसंख्या वाढली होती. मात्र नंतर २३,०८३ वरून रुग्णसंख्या ११,३४७ इतकी कमी झाली. अमेरिकेमध्ये मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढू लागली होती. जी ७ देशांच्या गटात लसीकरणामध्ये कॅनडाचा पहिला क्रमांक येतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा