31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनिया"भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं"

“भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं”

प्रत्येक क्षेत्रात इनोव्हेशन्सला सहाय्य देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

Google News Follow

Related

आज देशात ७० हजारपेक्षा जास्त स्टार्टअप आणि १०० पेक्षा जास्त युनिकाॅर्न आहेत. भारताचे स्थित्यंतर एका उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) हबमध्ये करायचे आहे. त्यामुळे नवनिर्मितीला सहाय्य करतानाच लाेककेंद्रीत विकास या माॅडेलवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितलं. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये सुरू असलेल्या एससीओ परिषदेमध्ये ते बाेलत हाेते.

देशाच्या अर्थव्यवस्थेत या वर्षात ७.५% दराने वाढ हाेण्याची अपेक्षा आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे ही आनंदाची गाेष्ट आहे. एप्रिल २०२२ मध्ये डब्ल्यूएचओने गुजरातमध्ये पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्राचे उद्घाटन केले. पारंपारिक उपचारांसाठी डब्ल्यूएचओचे हे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र होते. पारंपारिक औषधांवरील नवीन एससीओ कार्यगटासाठी भारत पुढाकार घेईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी बाेलताना दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी कोरोना महामारी आणि युक्रेनच्या संकटाचे वर्णन जागतिक पुरवठा साखळीतील अनेक अडथळ्यांचा उल्लेख करताना सांगितले की, आज संपूर्ण जग अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करत आहे. एससीओ आमच्या प्रदेशात विश्वसनीय लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना ट्रान्झिटचे पूर्ण अधिकार देण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगासमोर आपल्या नागरिकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हे आज माेठे आव्हान आहे. या समस्येवर एक संभाव्य उपाय म्हणजे बाजरीची लागवड आणि त्याच्या वापरास प्रोत्साहन देणे. समरकंद एससीओ येथे बोलताना मोदी म्हणाले की बाजरी हा एक सुपरफूड आहे जे हजारो वर्षांपासून केवळ एससीओ देशांमध्येच नाही तर जगाच्या अनेक भागांमध्ये पिकवला जातो आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी पारंपारिक पौष्टिक आणि कमी किमतीचा पर्याय आहे. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे केले जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा