28 C
Mumbai
Thursday, September 29, 2022
घरविशेषमुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

सध्या राज्यासह मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे.

Related

सध्या राज्यासह मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील विविध उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसाचा फटका चाकरमान्यांना बसला असून मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती आहे. तर मुंबई- नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रात्रभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्यानंतर सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सकाळपासूनच मुंबईसह ठाणे परिसारत पावासाचा जोर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांना सतर्क राहावं लागणार आहे.

हे ही वाचा:

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

मुंबईसह पुणे, नाशिक, रायगड, पालघर, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा