29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरदेश दुनिया२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

टेनिसचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या रॉजर फेडरर याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

Google News Follow

Related

टेनिसचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या रॉजर फेडरर याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. स्वित्झर्लंडचा महान टेनिसस्टार रॉजर फेडरर याने गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे टेनिसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने एक व्हिडीओ शेअर करत आणि पत्र लिहीत याबद्दल माहिती दिली आहे.

गेले अनेक महिने फेडरर दुखापतीमुळे टेनिसपासून लांब होता. तसेच गेल्या तीन वर्षात त्याच्या गुडघ्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण पुढच्या वर्षी तो ग्रँड स्लॅममध्ये कमबॅक करेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती.

मात्र, २४ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २० ग्रँड स्लॅम खिताब आपल्या नावावर करणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचं रॉजर याने म्हटलं आहे.

“गेल्या २४ वर्षांत मी जवळपास १५०० हून अधिक सामने खेळलो आहे. पण माझ्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये कुठे थांबायचं, हे मला ठरवायला हवं,” असं रॉजर या पत्रात म्हणाला आहे.

हे ही वाचा:

भारत-चीन सीमा भागात उभारणार ६०० नवीन गावे

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

“पुढील आठवड्यात होणारी लेवर कप स्पर्धा ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल. अर्थात, यानंतरही मी टेनिस खेळत राहीन, पण ग्रँडस्लॅममध्ये नाही,” असंही त्याने म्हटलं आहे. मित्र, प्रतिस्पर्धी खेळाडू आणि आयुष्यभर पाठिंबा देणारे चाहते या मला टेनिसने दिलेल्या मोलाच्या भेटी आहेत असं म्हणत त्याने आपल्या पत्नीचेही आभार मानले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा