अमेरिकेतील एफबीआयच्या तपासानुसार, व्हाईट हाऊसबाहेरील सिक्रेट सर्व्हिस चेकपॉईंटवर गोळीबार करणाऱ्या बंदूकधाऱ्याची ओळख नसीरे बेस्ट अशी झाली आहे, असे न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात म्हटले आहे.
बंदूकधाऱ्याचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट नसला, तरी अहवालांनुसार तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि व्हाईट हाऊसच्या प्रवेश चौक्यांजवळ भटकंती करत असल्यामुळे सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांच्या नजरेत वारंवार आला होता. गेल्या वर्षी त्याला वाहन वाहतुकीत अडथळा आणणे आणि व्हाईट हाऊसच्या प्रतिबंधित पादचारी नियंत्रण पोस्टमध्ये प्रवेश करणे अशा अनैच्छिक गुन्ह्यांप्रकरणी दोनदा अटक करण्यात आली होती. जेव्हा वॉशिंग्टन डीसी पोलिस आणि सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा आधुनिक अवतार असल्याचे सांगत अटक व्हायची इच्छा व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
बिष्णोई गँगशी कनेक्शन? मुंबईत चिनी बनावटीच्या पिस्तुलासह तिघांना अटक
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी
व्हाइट हाऊसवर हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न
राजौरीत दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन शेरूवाली
तपासकर्त्यांना त्यामुळे हा हल्ला त्याच्या मानसिक अस्थिरतेतून झाल्याचा संशय आहे. मात्र, या हल्ल्यामागे कोणता राजकीय हेतू होता का, हे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. याआधी न्यायालयाने बेस्टला व्हाईट हाऊस परिसरापासून दूर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, २१ वर्षीय बेस्टने कथितरित्या त्या आदेशाचे उल्लंघन केले.
२४ मे रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार), सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांनी १७वा रस्ता, नॉर्थवेस्ट परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या बेस्टला पाहिले. त्याने बंदूक बाहेर काढून काही गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये किमान एक पादचारी गंभीर जखमी झाला. मात्र, सीक्रेट सर्व्हिसच्या युनिफॉर्म्ड डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्युत्तरादाखल गोळीबार करून त्याला निष्प्रभ केले. बेस्ट जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेबद्दल बोलताना, एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि माहिती उपलब्ध होताच ती जनतेसमोर मांडली जाईल. “व्हाईट हाऊस परिसरात झालेल्या गोळीबारानंतर प्रतिसाद देणाऱ्या सीक्रेट सर्व्हिसला एफबीआय मदत करत आहे — आम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही जनतेला माहिती देऊ,” असे पटेल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.







