29.9 C
Mumbai
Friday, May 15, 2026
घरदेश दुनियाशी जिनपिंग म्हणाले, अमेरिका अधोगतीकडे चालली

शी जिनपिंग म्हणाले, अमेरिका अधोगतीकडे चालली

ट्रम्प म्हणाले - १०० टक्के खरं, पण ते जो बायडेन यांच्या प्रशासनवार बोलले

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेच्या जागतिक स्थानाबाबत मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. शी जिनपिंग यांनी अमेरिका “घसरत चाललेली शक्ती” असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना “हो, ते १०० टक्के बरोबर आहेत, पण ते जो बायडेन यांच्या काळाबद्दल बोलत होते,” असे म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. त्यांनी दावा केला की, बायडेन प्रशासनाच्या चार वर्षांत अमेरिकेची अर्थव्यवस्था, सीमासुरक्षा आणि जागतिक प्रतिमा कमकुवत झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, “ओपन बॉर्डर्स, महागाई, चुकीची व्यापार धोरणे आणि वाढता गुन्हेगारी दर” यामुळे अमेरिका कमकुवत झाली होती.
हे ही वाचा:
पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ; तर सीएनजी २ रुपयांनी महागले

कडक उन्हात आरोग्यासाठी वरदान ठरतेय कैरी!

यूपीमध्ये वादळ-पावसाचा कहर; १०४ जणांचा मृत्यू

थायलंड ओपनमध्ये पीव्ही सिंधू आणि सात्विक-चिरागची दमदार आगेकूच, क्वार्टर फायनलमध्ये धडक

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वेळी स्वतःच्या नेतृत्वाखाली अमेरिका पुन्हा शक्तिशाली होत असल्याचाही दावा केला. त्यांनी म्हटले की, “आज अमेरिका जगातील सर्वात हॉट राष्ट्र बनली आहे.” त्यांनी अमेरिकन शेअर बाजारातील तेजी, रोजगार वाढ आणि लष्करी ताकद यांचा उल्लेख करत आपले प्रशासन देशाला नव्या उंचीवर नेत असल्याचे सांगितले.

दरम्यान, बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत शी जिनपिंग यांनी “थ्युसीडिडीज ट्रॅप” या संकल्पनेचाही उल्लेख केला. ही संकल्पना प्राचीन ग्रीक इतिहासकार थ्युसीडिडीज यांच्या विचारांवर आधारित असून उदयोन्मुख महासत्ता आणि विद्यमान महासत्ता यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दर्शवते. शी जिनपिंग यांनी चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी संघर्षाचा मार्ग टाळून स्थिर संबंध निर्माण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

या परिषदेत तैवानचा मुद्दा देखील चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. शी जिनपिंग यांनी अमेरिकेला इशारा देताना तैवानच्या प्रश्नाचे चुकीचे व्यवस्थापन झाले तर “संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थिती” निर्माण होऊ शकते, असे सांगितले. चीनने अमेरिकेच्या तैवानला दिल्या जाणाऱ्या लष्करी मदतीवर नाराजी व्यक्त केली.

याशिवाय इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा पुरवठा आणि जागतिक अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की चीनने अमेरिकेकडून तेल, सोयाबीन आणि बोईंग विमानांची खरेदी वाढवण्याची तयारी दर्शवली आहे.

या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे खुलेपणाने कौतुकही केले. “हॉलिवूडमध्येही असा नेता सापडणार नाही,” असे म्हणत त्यांनी शी जिनपिंग यांना मजबूत आणि प्रभावी नेता म्हटले. या दोन्ही नेत्यांमधील संवादामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांनीही आशावाद व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेतील राजकारणातही या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्या वक्तव्याचा वापर करून जो बायडेन प्रशासनावर टीका करण्याचा प्रयत्न केला असला, तरी चीन-अमेरिका संबंधांतील वाढता तणाव आणि जागतिक शक्ती संतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा