व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की ब्रिटनमध्ये पोहोचले. येथे ब्रिटन पंतप्रधान केयर स्टारमर यांनी त्यांचे स्वागत केले. रविवारी (२ मार्च) रोजी होणाऱ्या शिखर परिषदेला राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेला १२ युरोपीय देशांचे राष्ट्रप्रमुख देखील सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, शनिवार (१ मार्च) युक्रेन आणि ब्रिटनमध्ये कर्ज करार झाला. या कर्जामुळे युक्रेनला त्याची संरक्षण क्षमता वाढवण्यास आणि शस्त्रे खरेदी करण्यास मदत होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही देशांनी २.२६ अब्ज पौंड (सुमारे २५ हजार कोटी रुपये) कर्ज करारावर स्वाक्षरी केली. कराराअंतर्गत, कर्जाचा पहिला हप्ता पुढील आठवड्यात युक्रेनला मिळण्याची अपेक्षा आहे. या करारावर ब्रिटिश अर्थमंत्री राहेल रीव्हज आणि युक्रेनचे अर्थमंत्री सर्गेई मार्चेन्को यांनी स्वाक्षरी केली. यावेळी झेलेन्स्की आणि केयर स्टारमर देखील उपस्थित होते. झेलेन्स्की यांनी युनायटेड किंग्डम आणि पंतप्रधान स्टारमर यांचे आभार मानले.
हे ही वाचा :
मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याची वाघाशी झुंज
एसएफआयच्या आंदोलनात मंत्री बसू जखमी
पंजाब : कपूरथला २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार
१५ वर्षे जुने वाहन असेल तर ‘पेट्रोल’ नाही!
ते म्हणाले, युक्रेन आणि युनायटेड किंग्डमने कर्ज करारावर स्वाक्षरी केली. या कर्जामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता वाढेल आणि रशियन मालमत्तेतून नफा मिळवून त्याची परतफेड केली जाईल. हे पैसे युक्रेनमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीसाठी वापरले जातील. ‘हा खरा न्याय आहे’- ज्याने युद्ध सुरू केले त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. या युद्धाच्या सुरुवातीपासून युनायटेड किंग्डमच्या जनतेने आणि सरकारने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे झेलेन्स्की यांनी म्हटले.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादविवादानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक युरोपीय देश युक्रेनच्या समर्थनार्थ बाहेर पडले. ब्रिटनमध्ये आलेल्या झेलेन्स्की यांना भेटल्यानंतर पंतप्रधान स्टारमर म्हणाले की, ‘युक्रेनला माझा पाठिंबा अटळ आहे. ब्रिटन तुमच्या पाठीशी उभा आहे.