36 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरधर्म संस्कृतीनरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

वडनगर हे भारतातील आतापर्यंत सापडलेल्या एकाच तटबंदीमधील सर्वात जुने जिवंत शहर आहे

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव असलेल्या गुजरातच्या वडनगर येथे इसवीसन पूर्व ८०० म्हणजेच तब्बल २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष आढळले आहेत. आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्त्व विभाग, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजमधील संशोधकांना हे पुरावे आढळले आहेत.

या भागात सन २०१६पासून उत्खनन सुरू होते आणि पथकाने तब्बल २० मीटर खोल खणले होते. त्यानंतर मिळालेल्या या अवशेषांमध्ये सात सांस्कृतिक टप्पे आढळले आहेत, अशी माहिती आयआयटी खरगपूरच्या जीओलॉजी आणि जीओफिजिक्स या विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिंद्य सरकार यांनी दिली. हे संशोधन ‘’पूर्व ऐतिहासिक ते मध्ययुगीन काळातील दक्षिण आशियातील हवामान, मानवी वसाहती आणि स्थलांतर: वडनगर, पश्चिम भारत येथील नवीन पुरातत्व उत्खननातून पुरावा’ या नावाने ‘क्वाटेर्नरी सायन्स रिव्ह्यूज’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘या उत्खननात मौर्य, इंडो-ग्रीक, इंडो-सिथियन किंवा शक-क्षत्रपास, हिंदू-सोलंकी, सल्तनत-मुघल ते गायकवाड-ब्रिटिश वसाहत अशा सात संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. तसेच, सर्वांत जुने असे बौद्धधर्मियांचे प्रार्थानास्थळही उत्खननात आढळले,’ असे भारतीय पुरातत्त्व विभागाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर आणि या संशोधनाचे सहलेखक यांनी सांगितले.

या उत्खननात मातीची भांडी, तांबे, सोने, चांदी आणि लोखंडाच्या वस्तू आढळल्या आहेत. तसेच, बांगड्याही सापडल्या आहेत. वाडनगर येथे इंडो-ग्रीक राजवटीतील ग्रीक राजा अपोलोडेटस याची नाणीही आढळली आहेत.
पुरातत्वशास्त्रज्ञांनी असा दावाही केला आहे की, सापडलेल्या अवशेषांमुळे वडनगर हे भारतातील आतापर्यंत सापडलेल्या एकाच तटबंदीमधील सर्वात जुने जिवंत शहर आहे. अनिंद्य सरकार म्हणाले की ही वसाहत इसवी सन पूर्व १४०० एवढी जुनी असावी, म्हणजे उत्तर-शहरी हडप्पा कालावधीचा अगदी शेवटचा टप्पा. ते पुढे म्हणाले, ‘जर खरे असेल, तर गेल्या साडेपाच हजार वर्षांपासून भारतातील सांस्कृतिक घुसळणीचा हा पुरावा आहे आणि तथाकथित अंधार युग हे एक मिथक असू शकते.

‘वडनगरमधील सर्वांत प्राचीन वसाहतीचा काळ किमान इसवीसन पूर्व ८०० दरम्यान सुरू झाला, म्हणजे प्रारंभिक लोहयुग किंवा उत्तरार्ध वैदिक कालखंड आणि बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांच्या पूर्वकाळात. हा काळ मौर्य राजवटीत सुरू होतो आणि सुमारे १५० वर्षांच्या पतनाने संपतो. गुप्त साम्राज्याच्या अधोगतीनंतर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात विनाशहरीकरण, जलस्रोत कोरडे पडणे, दुष्काळ आणि लोकसंख्येत घट झाली,’ असे सरकार म्हणाले.

हे ही वाचा:

अयोध्येतील शीख समाजाकडून तीन दिवस ‘अखंड पाठ’

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!

शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

 

गेल्या २२०० वर्षांच्या भारतीय इतिहासातील अशांत काळात मध्य आशियापासून भारतापर्यंत (गुजरातसह) सात आक्रमणे झाली, ज्याचे ठसे वडनगरच्या सलग सांस्कृतिक कालखंडातही सापडतात. पुरातत्व विभागाचे पर्यवेक्षक मुकेश ठाकोर यांनी एएनआयला सांगितले की, उत्खनन केलेले अवशेष जिवंत शहरासारखे दिसण्याचे कारण म्हणजे जल व्यवस्थापन यंत्रणा खूप चांगली होती. त्या ठिकाणी विविध धर्मांचे लोक राहत होते. वडनगरमध्ये एक लाखाहून अधिक अवशेष सापडले असून सुमारे ३० स्थळांचे उत्खनन करण्यात आले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा