28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरधर्म संस्कृतीभजन ऐकत अयोध्येत करा डबल डेकर क्रूझने सफर

भजन ऐकत अयोध्येत करा डबल डेकर क्रूझने सफर

दीपोत्सवापूर्वी सरयूमध्ये क्रूझ सेवा सुरू होण्याची शक्यता

Google News Follow

Related

अयोध्येत रामलल्ला मंदिराच्या कामाला वेग आले आहे. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच आतुरले आहेत. काशीनंतर लवकरच अयोध्येच्या शरयू नदीमध्ये दुमजली क्रूझने फेरफटका मारता येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या दीपोत्सवापूर्वी सरयूमध्ये क्रूझ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

या क्रूझसाठी शरयू नदीच्या काठावर वर्कशॉप बांधण्याचे काम सुरु आहे. केरळमधून क्रूझचे भाग आणल्या जातील. या ठिकाणी त्याची जुळवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्ये डबल डेकर क्रूझ बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सोबतच शरयू घाटाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सुविधेसाठी एक मार्ग नया घाट ते गुप्तर घाटापर्यंत बांधण्यात येणार आहे. या क्रुझमुळे पर्यटन वाढण्यास चालना मिळणार आहे.

असे आहे डबल डेकर क्रूझ

क्रूझची लांबी २६ मीटर आणि रुंदी ८ .३ मीटर असेल. ही क्रूझ सौर उर्जेवर धावणार आहे. क्रूझमध्ये १०० लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. पहिल्या मजल्यावर ७२ ते १०० लोक बसू शकतील. क्रूझमध्ये कॅन्टीनसह सर्व सुविधा असतील. वरचा मजला पूर्णपणे रिकामा असेल, जिथे भाविक उभे राहून शरयू बिहारचा आनंद घेऊ शकतील. यासोबतच वरच्या मजल्यावरही कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

हे ही वाचा:

भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा

मुंबईत येथे होतोय साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल

नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार खाशाबा जाधव यांचा जीवनपट

निवडणूक आयोगाने शिंदे गटाबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देता येणार नाही!

भजने, स्तोत्रपठण ऐकत प्रवास

या डबल डेकर क्रूझमध्ये श्रीरामाची जीवनकथा चित्रपटांतून दाखवली जाईल, त्यानंतर स्तोत्र पठण पाठ होतील. त्याच बरोबर श्रीरामाची सुश्राव्य भजने ऐकता येतील. क्रूझचे अंतर्गत भाग रामचरितमानसच्या थीमवर आधारित आहेत. ९० मिनिटांच्या या प्रवासाला रामचरितमानस टूर म्हटले जाईल. यामध्ये राम घाट, लक्ष्मण घाट, गुप्तर घाट आणि सरयूचे इतर घाट समाविष्ट असतील. संपूर्ण प्रवास सुमारे १६ किलोमीटरचा असेल,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा