30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरधर्म संस्कृतीनिर्बंध असले तरी वाजंत्र्यांना परवानगी द्या!

निर्बंध असले तरी वाजंत्र्यांना परवानगी द्या!

Related

कोरोनासाठी लादण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात राज्य सरकारने शिथिल केले असले तरी गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यंदाही गणपतीच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

परिणामी यंदाही वाजंत्र्यांवर आर्थिक संकट आले आहे. गेल्या वर्षीपासून मागणीच नसल्यामुळे स्वतःच्या खिशातून वाद्यांची डागडुजी करण्याची वेळ वाजांत्र्यांवर आली आहे. मंडप परिसरात तरी अंतर राखून वादनाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील आगमन सोहळे आणी विसर्जन मिरवणुका यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. ढोल पथक, बँजो पथक तसेच पारंपारिक वाद्ये यांच्या सलामी मिरवणुकीत ठेवल्या जातात. त्यामुळे गणेशोत्सव हा त्यांचा कमाईचा हंगाम असतो. मात्र यंदा मिरवणुकांना परवानगी नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे वाजंत्र्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी परिस्थिती बिकट असल्याने पर्याय नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी किमान मंडप परिसरात तरी वादनाला परवानगी द्यावी, सुरक्षित अंतर ठेऊन वादन करण्याची तयारी आहे, असे वाजंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

बांधवगडमधील हत्तींना १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी! काय आहे बातमी वाचा…

कोरोना काळात फुलविक्रेत्यांचे चेहरे कोमेजले!

शिवमंदिरात जाताना बांधकाम व्यावसायिकाला मारले ठार

जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन

‘पुणेरी ढोल’ पथकातील तीन ते चार लाखांचे ढोल, १० ताशे आणि इतर साहित्य दोन वर्षांपासून एका जागी पडून आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जागेचे भाडे भरणे कठीण होत आहे. पथकातील सदस्यांकडून पैसे काढून पावसाळ्यात वाद्यांची डागडुजी केली, असे साईलीला ढोल पथकाच्या जाई सावंत यांनी सांगितले. वादन हा आमचा प्रमुख व्यवसाय नसला तरी त्याद्वारे मिळणारी रक्कम चरितार्थ चालवण्यासाठी थोडाफार हातभार लावणारी असते. गणेशोत्सवात मागणी असते. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतन कपात झाली. तसेच लग्न किंवा हळदी समारंभावरही मर्यादा आली त्यामुळे यावेळेची गणेशोत्सवाची मागणी महत्त्वाची आहे, असे लालबाग बिट्स बँजो पथकाचे अनिकेत दळवी यांनी सांगितले.

ढोलाच्या पानावर बुरशी चढणे, पान फाटणे, ताशे किंवा इतर धातूची वाद्ये गंजणे, वाद्यांचे दोर खराब होणे यावर मोठा वार्षिक खर्च केले जात असतो. मात्र दोन वर्षे मागणी नसल्याने वाद्यांच्या डागडुजीसाठीही पथकाकडे पैसे नाहीत. बँजो पथकांचीही अशीच अवस्था आहे. त्यासाठी पदरमोड करावी लागत असल्याने वाजंत्र्यांची परवड झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा