29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरधर्म संस्कृतीप्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळाची करतो सुरुवात

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळाची करतो सुरुवात

कपाळावर अंगारा लावून आणि देवाला प्रार्थना करून प्रग्नानंद खेळात चाल करतो.

Google News Follow

Related

बुद्धिबळ खेळात जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण करणारा तरुण भारतीय खेळाडू प्रज्ञानंद याने नुकतेच FTX क्रिप्टो कपमध्ये प्रसिद्ध खेळाडू कार्लसनचा पराभव केला, या स्पर्धेत जरी गुणांमुळे तो उपविजेता ठरला असला तरी चर्चेत मात्र प्रज्ञानंदचं होता.

कपाळावर अंगारा लावून आणि देवाला प्रार्थना करून प्रज्ञानंद खेळात चाल करतो. विशेष अशा कोणत्या एका हिंदू देवतेवर त्याची भक्ती नाही तर तो खेळाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करतो असे प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी म्हणाल्या. प्रज्ञानंदच्या बहिणीने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यानंतर प्रज्ञानंदला या खेळाची आवड लागली, असेही त्याची आई म्हणाली.

प्रज्ञानंद आणि त्याची मोठी बहिण हे इतर अनावश्यक गोष्टी टाळून बुद्धिबळबद्दल बोलतात आणि खेळतात, असं प्रज्ञानंदची आई आर. नागलक्ष्मी म्हणाल्या. दिवसातले पाच ते सहा तास बुद्धिबळ सराव करायचा आणि बुद्धिबळाच्या क्लासला ऑनलाईन हजेरी लावायची, असा दिनक्रम प्रज्ञानंद आणि त्याच्या मोठ्या बहिणीचा असल्याचं त्यांच्या आईने सांगितले.

हे ही वाचा:

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बारावीत असलेल्या प्रज्ञानंदसाठी हा महिना विशेष लक्षवेधी ठरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, त्याच्या संघाने ‘इंडिया- २’ ने ममल्लापुरम येथील ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक जिंकले. तर प्रज्ञानंदने त्याच्या वैयक्तिक कामगिरीसाठी कांस्यपदक जिंकले. क्रिप्टो स्पर्धेनंतर प्रज्ञानंद आता दुबई ओपनमध्ये सहभागी होणार असून नंतर मायदेशी परतणार असल्याची माहिती नागलक्ष्मी यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा