29 C
Mumbai
Tuesday, October 3, 2023
घरक्राईमनामादिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दिल्ली आणि उत्तरप्रदेशात होणाऱ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

Google News Follow

Related

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दिल्ली आणि उत्तरप्रदेशात होणाऱ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. पुण्यातून महाराष्ट्र एटीएसने एकाला अटक केली आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार यांच्या निशाण्यावर नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी होते. तसेच उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भाजपाच्या रॅलीवर देखील हल्ला करायचा प्लॅन बनवला होता.

विशेष म्हणजे या हल्ल्यात वापरण्यासाठी लागणारी स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात असलेल्या एका मास्टरमाईंडकडून येणार होते. तसेच जुनैद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय होता. सतराहून अधिक फेसबुक अकाउंट तयार करून तो त्याद्वारे इतरांशी संवाद साधायचा.

हे ही वाचा:

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

मेधा पाटकर यांच्या भूमिकेत होते आदित्य ठाकरे…

कोकणातील रस्तेदुरुस्ती गुरुवारपर्यंत पूर्ण करा

‘मढ येथील अस्लम शेख यांचा स्टुडिओ पाडा’

जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहे. वसीम रिजवी यांनी सनातन धर्मात प्रवेश केला होता. नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबाद मधील शिवशक्ती धामचे महंत आहे. संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशचे असून वादात सापडलेल्या गाण्यांचे ते लेखक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा