28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषपाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

Google News Follow

Related

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात काही महिन्यांपूर्वी ब्राह्मोस मिसाईलचे मिसफायर झाले होते. या प्रकरणी हवाई दलाने मोठी कारवाई केली आहे. हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर आणि एक स्क्वाड्रन लीडर यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

९ मार्च २०२२ रोजी चुकीमुळे भारतामधून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात ब्राह्मोस मिसाईल गेले होते. याप्रकरणी पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या हद्दीत ब्राह्मोस मिसाईल गेल्याप्रकरणी तीन अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर हवाई दलाकडून कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या तीन अधिकार्‍यांची सेवा केंद्र सरकारने तात्काळ संपुष्टात आणली आहे. २३ ऑगस्ट रोजी या अधिकार्‍यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे हवाई दलाच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्रम्होस मिसफायर घडले, त्यावेळी संरक्षण मंत्रालयाने ती घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती.

हे ही वाचा:

आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या इमामांना नोंदणी करावी लागणार

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

९ मार्च २०२२ रोजी संरक्षण दलाच्या हरियाणा येथील तळावरून ब्राह्मोस मिसाईल थेट पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या घटनेची दखल घेतली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा