28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरराजकारणआसाममध्ये बाहेरून येणाऱ्या इमामांना नोंदणी करावी लागणार

आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या इमामांना नोंदणी करावी लागणार

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आदेश

Related

आसाममधील बेकायदेशीररित्या वास्तव्याला येणाऱ्या लोकांविरोधात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कठोर पावले उचलली आहेत. आता मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सोमवारी माहिती दिली की त्यांचे सरकार एक विशेष वेबसाइट पोर्टल बनवत आहे. आसामच्या बाहेरून राज्यातील मदरशांमध्ये येणारे लोक किंवा इमाम यांना या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

हेमंत बिस्वा सरमा यांचे सरकार अशी मार्गदर्शक तत्त्वे बनवणार आहे की, असा कोणी इमाम गावात आल्यास, ज्याला लोकांना माहिती नाही, तर लोकांनी त्वरित पोलिसांना कळवावे. त्यानंतर पोलीस त्या इमामाची पडताळणी करतील. पडताळणी केल्यानंतरच तो इमाम तिथे थांबू शकेल. आसाममधील मुस्लिम समुदायही याप्रकरणी सरकारला मदत करत असल्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले आहे.

हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, तंत्रज्ञान जाणणारे विदेशी दहशतवादी त्यांच्या राज्याला इस्लामिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अटक करण्यात आलेल्या इमामांवर राज्यातील मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात गुंतल्याचा आरोप आहे. त्याचा भारतीय उपखंडातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हा कठोर निर्णय घेतल्याचे हेमंत बिस्वा यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू

दरम्यान, हेमंत बिस्वा सरमा आणि त्यांचे मेघालय समकक्ष यांनी रविवारी उर्वरित सहा क्षेत्रांमधील आंतरराज्य सीमा विवाद सोडविण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दोन राज्यांमध्ये सहा अन्य समान क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी करार करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा