26 C
Mumbai
Tuesday, February 20, 2024
घरधर्म संस्कृतीपंतप्रधान मोदींच्या रूपाने 'श्रीमंत योगी' प्राप्त झाले आहेत

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले गौरवोद्गार

Google News Follow

Related

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. याशिवाय त्यांचा उल्लेख ‘श्रीमान योगी’ असा केला. आज राम मंदिरात केवळ एका मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही, तर या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे, असं गोविंददेव म्हणाले. “अमूक एक परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभले आहेत,” अशा शब्दात नरेंद्र मोदी यांचे गोविंददेव गिरी महाराज यांनी कौतुक केले आहे.

“मला २० दिवसांपूर्वी निरोप मिळाला की, पंतप्रधान मोदी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीसाठी काय करावे लागेल. त्यासाठी काय नियम आहेत, असे मला विचारण्यात आले. आपल्या देशात राजकीय पुढारी कधीही काहीही करतात. पण पंतप्रधान मोदींनी नियम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतातील सर्वोच्च आदर्श पुरूष प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काय करावे लागले, हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी केवळ तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी ११ दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपी गोष्ट नाही. तसेच दिव्य देशांचा प्रवास करावा असेही आम्ही सांगितले. मोदींनी नाशिकच्या पंचवटीपासून प्रवास सुरू केला ते कन्याकुमारीच्या रामेश्वरपर्यंत ते गेले. आम्ही तीन दिवस भूमिशयन करायला सांगतिले होते. पण या कडाक्याच्या थंडीत पंतप्रधान मोदी ११ दिवस भूमिशयन करत आहेत,” अशी माहिती गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितली.

हे ही वाचा:

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!

तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला सन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले”, अशी आठवण गोविंददेव गिरी यांनी सांगितली. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी”. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे”, अशी भावना गोविंदगिरी महाराजांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते तीर्थ प्राशन करून पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांच्या परवानगीने ११ दिवसांचा उपवास सोडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
129,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा