30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरधर्म संस्कृतीबाप्पाच्या तयारीसाठी ऑनलाईन खरेदीला पसंती!

बाप्पाच्या तयारीसाठी ऑनलाईन खरेदीला पसंती!

Related

गेल्या दोन वर्षांमध्ये ऑनलाईन व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी काही नागरिकांनी बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला महत्त्व दिले आहे. लोकांच्या ऑनलाईन खरेदीची आवड लक्षात घेऊन काही गृहिणींनी गणेशोत्सवात लागणारे सजावटीचे साहित्य आणि गौराईसाठी लागणारे वस्त्र, खाद्यपदार्थ आणि ते सर्व खाद्यपदार्थ त्वरित बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ऑनलाईन माध्यमातून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडूनही त्यास चांगली पसंती मिळत आहे.

गणपतीच्या दहा दिवसांत घराघरात वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. अनेक महिलांना आपली नोकरी व्यवसाय सांभाळून हे पदार्थ बनवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अनेकदा महिला शहरातील उपहारगृहांमधून हे पदार्थ मागवण्यास प्राधान्य देतात. याच गोष्टी लक्षात घेऊन अंबरनाथ, बदलापूर, कल्याण- डोंबिवली यासारख्या शहरांमध्ये कमी पैशात आणि घरगुती पद्धतीने बनवलेल्या पदार्थांची आणि ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

बांधवगडमधील हत्तींना १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी! काय आहे बातमी वाचा…

‘चितळे एक्स्प्रेस’ची आता इथेही शाखा!

या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद

ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या उच्च प्रतीच्या तांदळाच्या पिठाची ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. या पिठाला महिलांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. त्याचबरोबर खान्देश प्रांतात तयार केले जाणारे मांडे म्हणजेच खापरावरची पुरणपोळी; याचीही काही महिलांनी ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. गणेशोत्सवासाठी अनेक महिलांनी यासाठी आगाऊ मागणीही केली असल्याचे विक्रेत्या महिलांनी सांगितले. प्रसादासाठी लागणाऱ्या लाडू आणि इतर पदार्थांची विक्रीही महिला करत आहेत. गौराईसाठी लागणारी वस्त्रे, गणपतीची वस्त्रे, आभूषणे, पूजेचे साहित्य अशा वस्तूंचीही ऑनलाईन विक्री केली जात आहे.

दैनंदिन नोकरी सांभाळत गणेशोत्सवात विविध खाद्यपदार्थ बनवणे अनेक महिलांना शक्य होत नाही. अशा वेळी आयते सामान मिळाल्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. या सर्व साहित्याची आणि पदार्थांची चांगली विक्री होत असल्याने गृहिणींनाही एक रोजगार मिळतो, असे अंबरनाथमधील मोदक साहित्य विक्रेत्या अंजली गोखले यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा