24 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरधर्म संस्कृतीभारतातील विमानतळांवर वाजणार 'आपले' संगीत

भारतातील विमानतळांवर वाजणार ‘आपले’ संगीत

Related

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (ICCR) एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्यांच्या विनंतीनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील भारतीय विमान कंपन्या आणि विमानतळांना भारतीय संगीत वाजवण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांनी २७ डिसेंबर रोजीच्या पत्रात लिहिले आहे की, “भारतात चालवल्या जाणार्‍या विमानांमध्ये आणि विमानतळांवर नियमांचे पालन करून भारतीय संगीत वाजविण्याचा विचार करावा,” अशी विनंती केली आहे.नेमके भारतीय संगीत कोणते याचे स्पष्टीकरण पत्रात दिले नसले तरी, भारतीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, वाद्य आदी यांचा समावेश असलेल्या संगीताचा समावेश आहे, असे पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल

डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले

‘ठाकरे सरकारने डिग्री विकायला काढल्या तर आश्चर्य वाटणार नाही’

गेल्या आठवड्यात, आयसीसीआर अध्यक्ष आणि राज्यसभेतील भाजप खासदार, विनय सहस्रबुद्धे यांनी अनेक गायक आणि कलाकारांच्या उपस्थितीत नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक पत्र सुपूर्द केले. या पत्रात म्हटले आहे की, “भारतातील बहुतेक खाजगी आणि सरकारी मालकीच्या विमान कंपन्या, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान कंपन्या क्वचितच, विमानात किंवा विमानतळावर भारतीय संगीत वाजवतात आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपले संगीत हे आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असून त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा.”

त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील भारतीय विमान कंपन्या आणि विमानतळांना भारतीय संगीत वाजवण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा