38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरधर्म संस्कृतीरामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला

Google News Follow

Related

गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश येऊन २०२४ मध्ये संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री रामाचे मंदिर निर्माण झाले. अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यामुळे आता राम मंदिराच्या निर्माणानंतर आलेली ही राम नवमी विशेष आणि मोठ्या उत्साहाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मंदिराच्या निर्माणाची सर्वांना आस होती ते भव्यदिव्य मंदिरही आता उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदाचा रामनवमी उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

देशभरासह जगभरात रामनवमीचा उत्साह असतो. रावणाच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावर प्रभू रामाचा जन्म घेतल्याची अख्यायीका आहे. प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला. तेव्हापासून राम नवमीचा उत्सव हिंदू धर्मीयांमध्ये साजरा करण्यात येतो. भगवान रामांचा जन्म राजा दशरथ आणि कौशल्या राणींच्या पोटी झाल्यानंतर हा उत्सव अयोध्येतून सुरू झाला. प्रभू श्री रामाचा जन्म दुपारी झाला आणि त्याच वेळी रामनवमी तिथीला त्यांची पूजा करण्यात आली. या दिवशी भक्त मंदिरांना भेट देतात, प्रार्थना करतात, धार्मिक विधी करतात, उपवास करतात आणि मंत्रांचा जप करतात. हा सण भारतासह नेपाळ आणि बांगलादेशमधील हिंदूंमध्ये आणि उत्तर अमेरिका आणि युरोपमधील काही हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

रामनवमी हिंदू चंद्राच्या चैत्राच्या नवव्या दिवशी (नवमी तिथी) येते. रामनवमीचे ऐतिहासिक महत्त्व हे प्राचीन काळापासूनचे आहे. जेव्हा राजा दशरथ यांनी त्यांना मूळ होत नव्हते तेव्हा त्यांनी ऋषी वशिष्ठ यांच्या सल्ल्यानुसार पुत्र कामस्ती यज्ञ केला. परिणामी राणी कौशल्याने राम, सुमित्रा हिने शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि कैकेयीने भगवान भरत यांना जन्म दिला.

भगवान राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार असल्याचे मानले जाते. वाल्मिकी यांच्या रामायण या ग्रथांत तसे नमूदही करण्यात आले आहे. रावणाच्या त्रासाला कंटाळून ऋषी मुनी वैतागले होते. ऋषी मुनी करत असलेल्या यज्ञांत दानवांकडून संकटे आणली जात होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी राम अवतार घेत रावणाचा संहार केल्याची अख्यायिका रामायणात आहे. भगवान राम यांना भगवान विष्णूचा सातवा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम अशा नावांनीही ओळखले जाते.

हे ही वाचा:

ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक

‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!

मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

भारतात रामनवमी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याने हिंदू धर्मीय नागरिक या दिवशी अयोध्येला जातात. अयोध्येतील शरयू नदीत स्वच्छ अंघोळ करुन नागरिक अर्घ्य वाहतात. राम मंदिराच्या निर्माणामुळे यंदा राम भक्तांचा उत्साह द्विगुणीत असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा