31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरराजकारण'स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत'!

‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!

लालू यादव यांच्या आरोपावर पंतप्रधान मोदींचे गया येथून प्रत्युत्तर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(१६ एप्रिल) बिहारमधील गया येथे सभेला संबोधित केले.पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला.आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी लालू प्रसाद यादव यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना दिसले.भाजपला ४०० जागा मिळाल्यास ते राज्यघटना बदलतील, अशी भाषा लालू प्रसाद यादव यांनी केली होती.यावर पंतप्रधान म्हणाले की, देशाची राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही.

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप संविधान बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते.जो कोणी असा प्रयत्न करेल, जनता त्याचे डोळे फाडून टाकेल, असेही ते म्हणाले होते.यावर पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर देत लालू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींनी संविधान बदलण्याच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले की, खुद्द बाबासाहेब आंबेडकरही संविधान बदलू शकत नाहीत, मग भाजपची हिंमत कशी होणार? त्यांना माहित असावे की, या संविधान सभेचे नेतृत्व देशाचे रत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले होते.बाबासाहेबांचे हृदय, मन आणि लेखणी या संविधानाला शब्दरूप देत होती.संविधानाच्या बळावरच मोदी आज या स्थानावर असल्याचे ते म्हणाले. हे संविधान नसते तर एवढ्या मागासलेल्या कुटुंबात जन्मलेला गरीब मुलगा कधीच देशाचा पंतप्रधान होऊ शकला नसता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

“व्याज दर कमी ठेवून आर्थिक प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी युपीएचा आरबीआयवर दबाव”

सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक दशके गरीबांना अन्न आणि निवारा देण्याची स्वप्ने दाखवली आणि एनडीए सरकारने चार कोटी गरिबांना कायमस्वरूपी घरे दिली. दलित, वंचित आणि मागासवर्गीयांच्या नावावर काँग्रेस आणि आरजेडीने आपले राजकीय हित कसे साधले, याचे आमचे सहकारी जीतनराम मांझी हे साक्षीदार आहेत. एनडीएने दलित, वंचित आणि मागासलेल्या लोकांना हक्क आणि सन्मानाचे जीवन दिले आहे. मोदींचे हमीपत्र पुढील ५ वर्षांसाठी अपडेट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गरिबांसाठी तीन कोटी कायमस्वरूपी घरे बांधणार, ही मोदींची हमी. गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत रेशन मिळेल, ही मोदींची हमी. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्धाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळेल, ही मोदींची हमी. किसान सन्मान निधी भविष्यातही सुरू राहील, ही मोदींची हमी. ते म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटक आणि प्रत्येक क्षेत्रासाठी विकासाचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ तारखेला मतदान होणार असून भाजपला पूर्ण ताकदीनिशी विजयी करायचे आहे, असे आवाहन केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा