31 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषभाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगालसाठी सात नावे जाहीर

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची १२वी यादी जाहीर केली आहे. भाजपने महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसाठी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे.

महाराष्ट्रामधून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाकडून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यावर ठाम होते. तसेच त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. त्यानंतर आज मंगळवारी(१६ एप्रिल) भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे.या यादीत महाराष्ट्रातील १ , पंजाबमधील ३ जागा, उत्तर प्रदेशच्या दोन आणि पश्चिम बंगालमधील एक जागेचा समावेश आहे.

हे ही वाचा:

इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

“व्याज दर कमी ठेवून आर्थिक प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी युपीएचा आरबीआयवर दबाव”

सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून तिकीट देण्यात आले आहे.तर उत्तर प्रदेशातील देवरियातून शशांक मणि त्रिपाठी आणि फिरोजाबादमधून ठाकूर विश्वदीप सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर जागेवरून अभिजित दास (बॉबी) यांना उमेदवारी दिली आहे.पंजाबमधील खादूर साहिबमधून मनजीत सिंग मन्ना मियाविंद, होशियारपूरमधून अनिता सोम प्रकाश आणि भटिंडामधून परमपाल कौर सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा