सांगली शहरातील वखार भागातील ईदगाह मैदानालगत असलेला सांगली महापालिकेच्या मालकीचा रस्ता मरकसच्या मुस्लिम ट्रस्टीने मुरमाचे ढीग टाकून अडवला होता व ईदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीकडे जाण्यासाठी व ट्रक पार्किंगकडे ट्रक चालकांना जाण्यासाठी विरोध होत होता या विरोधात वखार भागातल्या शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीत म्हटले होते की, आम्हाला या रस्त्यावरून जनावरांसाठी वैरण आणावी लागते परंतु रस्त्यामध्ये मुरमाचे ढीग टाकले आहेत त्यामुळे आमच्या जनावरांची उपासमार होत आहे आम्हाला इथून वाहने घेऊन वैरण आणण्यासाठी हा रस्ता मोकळा करून मिळावा. हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देऊन तो रस्ता जेसीबीच्या साह्याने मोकळा करावा, अशी मागणी केली होती.
हे ही वाचा:
अजबच! मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा फोन
अमेरिकेच्या एफबीआय संचालकांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ!
मित्रपक्षाला धक्क्याला लावणारे आज बनले ‘धक्का पुरुष’!
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने अडवणूक करण्यासाठी टाकलेले मुरमाचे ढीग जेसीबीने पसरून घेऊन साफ केले व शेतकऱ्यांना व ट्रक चालकांना अडवलेला रस्ता मोकळा करून दिला.
रस्ता मोकळा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे आभार मानले.
याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंखे, यश पाटील, अनिरुद्ध कुंभार, अभिमन्यू अपराध, प्रसाद रिसिवडे, भागाप्पा वाघमोडे, प्रकाश चौगुले, योगेश सूर्यवंशी, अशोक यादव, आदी उपस्थित होते.