28 C
Mumbai
Sunday, December 4, 2022
घरधर्म संस्कृतीब्रिटनमधील हिंदू मंदिरांवरील हल्ले थांबवा, जिहाद्यांना अटक करा

ब्रिटनमधील हिंदू मंदिरांवरील हल्ले थांबवा, जिहाद्यांना अटक करा

विश्व हिंदू परिषदेची ब्रिटिश उच्चायुक्तांकडे मागणी

Google News Follow

Related

ब्रिटनमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर व निष्पाप हिंदू नागरिकांवर होणारे जेहादी हल्ले त्वरित थांबवावे तसेच हल्ले करणाऱ्या जेहाद्यांना त्वरित अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने ब्रिटीश उच्चायुक्तांकडे केली आहे.

मुंबई, विश्व हिंदू परिषदेच्या श्रीराज नायर – वि.हिं.प. कोंकण प्रांत सहमंत्री व प्रवक्ता तसेच संजय ढवळीकर विशेष संपर्क प्रमुख मुंबई व बंगळूरू क्षेत्र यांच्या शिष्ठ मंडळाने मुंबई येथील ब्रिटीश उच्चायुक्ताना भेटून ब्रिटनमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर व निष्पाप हिंदू नागरिकांवर होणारे जेहादी हल्ले त्वरित थांबवावे तसेच हल्ले करणाऱ्या जेहाद्यांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

दिनांक २१ सप्टेंबर रोजी बर्मिंगहॅम, लंडन, लेस्टर येथील हिंदू मंदिरांना तसेच सांकृतिक व धार्मिक प्रतिकांना जेहादी मानसिकतेने ग्रसित धर्मांध मुसलमानांनी लक्ष केले होते. या भ्याड हल्यात अनेक हिंदू नागरिक जबर जखमी झाले होते तसेच हिंदूंच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले होते. ४ सप्टेंबरपासून ब्रिटनच्या विविध भागात हिंदू मंदिरे, हिंदू संपत्ती तसेच हिंदू नागरिकांना ठरवून लक्ष्य करण्यात येत आहे. परंतु ब्रिटनचे स्थानिक प्रशासन हे जेहादी हल्ले थांबविण्यात सपशेल अयशस्वी ठरत आहेत. या मुळे अनेक हिंदू परिवारांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे.

हे ही वाचा:

पूजा कोणाची करा, हे जामिनावरील आरोपी सांगतोय….

रियाज भाटीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवरात्र २०२२: करवीर आणि महालक्ष्मीची गाथा

 

ठरवून हिंदू समाजावर जेहादी हल्ले करून “हिंदू-मुसलमान दंगे” म्हणत हल्ल्यांचे सर्व खापर हिंदूंच्या माथी मारून मुस्लीम समाज निष्पाप असल्याचे ढोंग करीत आहे. मुस्लिम समाजाचा ढोंगीपणा उघडकीस आणून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी या करिता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकरी अध्यक्ष आलोक कुमार यांनी ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लीज ट्रस यांना पत्र पाठवून या भ्याड हल्याचा निषेध नोंदवला आहे.

ब्रिटन मध्ये एकूण लोकसंखेच्या १.५% हिंदू समाज राहत असून, शांती प्रिय व बुद्धीजीवी हिंदू समाज स्थानिक नियमांचे काटेकोर पालन करीत स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणत रोजगार उपलब्ध करून देतो. असे वक्तव्य हिंदू समाजाने आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात दिवंगत प्रधानमंत्री मार्गारेट थैचर यांनी केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,947चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा