28 C
Mumbai
Sunday, December 4, 2022
घरराजकारणसर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली, शिंदेंना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली, शिंदेंना दिलासा

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला आहे. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळत निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ केली जाणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पक्षाचे चिन्ह मिळवण्याची लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. यादरम्यान आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आला होता. निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, आता शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्व असते हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्ध झाले आहे. विधानसभेत आणि लोकसभेतही आज बहुमत आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होत असतात जे घटना, कायदे यांवर आधारितच होत असतात. म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाने देखील या सर्वच बाबींचा विचार करुन विरोधीपक्षाला जी स्थगिती पाहिजे होती ती फेटाळली आहे.

हे ही वाचा:

पूजा कोणाची करा, हे जामिनावरील आरोपी सांगतोय….

अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

पीएफआय सदस्यांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व

दरम्यान, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. आजपासून घटनापीठासमोर सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,947चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा