28 C
Mumbai
Monday, December 5, 2022
घरक्राईमनामापीएफआय सदस्यांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर

पीएफआय सदस्यांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर

Google News Follow

Related

मध्य प्रदेश पोलसांनी पीएफआयवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पीएफआयचे पाकिस्तानसोबत असलेले संबंधही समोर आले आहेत. आज, २७ सेप्टेंबर रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांकडून देशातील आठ राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमधून पन्नासहुन अधिक पाकिस्तानी नंबर आढळून आले आहेत.

अलीकडेच पीएफआयचे अब्दुल करीम (राज्याध्यक्ष), मोहम्मद जावेद (राज्य कोषाध्यक्ष), जमील शेख (राज्य सचिव) आणि अब्दुल खालिद (महासचिव) यांना अटक करण्यात आली. एटीएस सर्व आरोपींची चौकशी करत आहे. न्यायालयाने आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं तपासली असता त्यांचे पाकिस्तान संबंध समोर आला आहे. आरोपी अब्दुल खालिदच्या मोबाईल फोनने अनेक गुपिते उघड केली आहेत. खालिदच्या मोबाईलमध्ये पन्नासहून अधिक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. त्याच्या भाऊ मोहम्मद महमूदही सहा वेळा पाकिस्तानला गेला आहे. तपास यंत्रणा मोहम्मद मेहमूदचा शोध घेत आहे.

हे ही वाचा:

अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

आठ राज्यांमध्ये NIA कडून PFI वर कारवाई

१० युट्यूब वाहिन्यांवरील ४५ व्हिडीओ हटवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

भुजबळ म्हणतात, सरस्वतीची नको, सावित्रीची पूजा करा

दरम्यान, एनआयएने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेलल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,946चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा