द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार, क्षयरोग (टीबी) रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये लक्षणविरहित (Asymptomatic) टीबी संसर्ग ओळखण्यासाठी केवळ छातीचा एक्स-रे (Chest X-ray) हा पुरेसा निदानाचा मार्ग नाही. दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन विद्यापीठातील संशोधकांनी तीन आफ्रिकन समुदायांमध्ये फुफ्फुसातील क्षयरोग (Pulmonary Tuberculosis) असलेल्या रुग्णांच्या ९७९ निकट नातेवाईकांचे सखोल परीक्षण केले. यामध्ये त्यांनी बलगमातील जिवाणूंची तपासणी (Sputum Microbiological Testing) आणि क्रमबद्ध आरोग्य तपासणी (Systematic Screening) केली.
त्यांनी या परिणामांची तुलना मायक्रोबायोलॉजिकल रेफरन्स स्टँडर्डच्या तुलनेत केली आणि टीबीच्या लक्षणांवर आधारित तपासणी तसेच छातीच्या एक्स-रेच्या निष्कर्षांचा अभ्यास केला. या संशोधनात असे दिसून आले की, ५.२% नातेवाईकांमध्ये फुफ्फुसातील टीबीची पुष्टी झाली. यापैकी तब्बल ८२.४% जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. छातीचा एक्स-रे ४०% प्रकरणे ओळखू शकला नाही. मुख्य लेखक डॉ. सायमन सी. मेंडेलसोहन, जे South African Tuberculosis Vaccine Initiative चे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितले, “टीबीने बाधित ८० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, आणि छातीच्या एक्स-रेवर आधारित तपासणी या प्रकरणांपैकी ४०% हून अधिक ओळखण्यात अपयशी ठरली.”
हेही वाचा..
अभिनेते सतीश शाह यांचे निधन किडनी निकामीमुळे नाहीतर ‘या’ कारणामुळे, सहकलाकाराचा खुलासा!
कॅनडात भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!
प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये जगभरात सुमारे १०.८ दशलक्ष टीबी रुग्णांपैकी जवळपास २.७ दशलक्ष (२५%) रुग्णांचे निदान किंवा उपचार झालेच नाहीत. या “हरवलेल्या” रुग्णांना शोधणे आणि उपचार देणे आवश्यक असले, तरी आव्हान असे आहे की, त्यांच्यात बहुतांश वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. संशोधनात म्हटले आहे की, लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या टीबी प्रकरणांपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणे लक्षणविरहित होती. म्हणजेच खोकला, ताप, रात्री घाम येणे, वजन घटणे अशी पारंपरिक टीबीची लक्षणे या लोकांमध्ये नव्हती, किंवा त्यांनी ती ओळखली नाहीत. लक्षणविरहित टीबी रुग्णांमध्ये बॅक्टेरियांची संख्या कमी होती आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (CRP) पातळीही सामान्य होती. म्हणजेच ते आरोग्यदृष्ट्या सामान्य लोकांपासून फार वेगळे दिसत नव्हते. लक्षणविरहित टीबीसाठी छातीच्या एक्स-रेची अचूकता (Sensitivity): फक्त ५६.१% लक्षणे + एक्स-रे दोन्ही वापरल्यास अचूकता: ६४%.







