पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास गुलकंदचा नियमित वापर फायदेशीर ठरू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या या गुलकंदाला आयुर्वेदामध्ये “रसायन” – म्हणजेच शरीर आणि मन दोघांनाही पोषण देणारे टॉनिक मानले जाते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना पचनाशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. अशा वेळी गुलकंद पित्तदोष नियंत्रित करून पाचनतंत्राला थंडावा देतो. उन्हाळ्यात होणारी घामाची उकड, नाकातून रक्त येणे (नकसीर), जळजळ, थकवा यांवरही गुलकंद लाभदायक असतो.
गुलकंद तोंडातल्या फोडांवरही उपयुक्त आहे. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सात्विक गुण असतात, जे मनाला शांत करतात. त्यामुळे चिंता, तणाव आणि झोपेच्या समस्या दूर होतात. आयुर्वेदानुसार, गुलकंद मन व हृदयाचे पोषण करतं. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यामध्येही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे — मुरुमं, डाग आणि अॅलर्जी यावर गुलकंद उपयुक्त आहे.
महिलांसाठीही गुलकंद विशेष फायदेशीर ठरतो. मासिक पाळीतील त्रास, अतिरक्तस्राव किंवा पित्त वाढल्यास गुलकंद आराम देतो. गर्भवती महिलांमध्ये पोटाची उष्णता व जळजळ शांत करतं.
गुलकंद सेवनाचे विविध मार्ग आहेत — काहींना ते पानासोबत आवडतं, तर काही दूध किंवा पाण्याबरोबर घेतात. रिकाम्या पोटी घेतल्यास ते पचनासाठी अधिक उपयुक्त ठरतं. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गुलकंद घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आयुर्वेदानुसार गुलकंद हे एक पोषणदायी टॉनिक असून, नियमित व योग्य प्रमाणात घेतल्यास संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
