29 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणउद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री...

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

Related

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पालघरमध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून शुक्रवार, १५ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि आमदार श्रीनिवास वनगादेखील उपस्थित होते.

आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा असताना राजेंद्र गावित यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यातील अनेक पदाधिकारी, आमदार, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे. पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये काही दिवस चलबिचल सुरू होती. त्यानंतर शुक्रवारी अनेक नेते, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यासाठी म्हणून मुंबईत दाखल झाले होते.

हे ही वाचा:

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

आमदार श्रीनिवास यांच्या सोबत काल रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम, मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांच्यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी नगरपरिषदचे सर्व नगरसेवक, पालघर जिल्हा परिषदेचे सहा सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत दाखल झालेले वसई-विरारचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह जवळपास ५० ते ६० शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,921चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा