29 C
Mumbai
Tuesday, August 18, 2026
घरराजकारणकेरळममधील काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना दाखवला आरसा

केरळममधील काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना दाखवला आरसा

केरळमधील विझिंजम बंदराला सतीशन यांच्याकडून हिरवा झेंडा

Google News Follow

Related

उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात सातत्याने गेली अनेक वर्षे गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींना त्यांचे सरकार असलेल्या केरळमच्या मुख्यमंत्र्यांनीच आरसा दाखवला आहे. केरळममधील विझिंगम येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बंदरातून आता आयात निर्यातीला सुरुवात झाली आहे. हे बंदर अदानी उद्योगसमुहाने उभारलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा दुटप्पीपणा आहे, अशी चर्चा रंगली आहे.

अदानी पोर्ट्सने विकसित केलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरातून जमिनीवर आधारित पूर्ण क्षमतेच्या आयात-निर्यात (EXIM) व्यवहारांना सुरुवात झाली असून, या बंदरामुळे केरळला थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या हस्ते या बंदरातून आयात निर्यातीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यावेळी त्यांनी विझिंगम बंदरात प्रवेश करणाऱ्या बोटींना झेंडा दाखवला. त्या झेंड्यावर अदानी हे बोधचिन्ह दिसत होते. त्यावरून सोशल मीडियात खमंग चर्चा रंगली.

राहुल गांधी यांनी अदानी यांच्याविरोधात राळ उडवलेली आहे. हिंडेनबर्गच्या मुद्द्यावरून तर राहुल गांधी यांनी प्रचंड गोंधळ घातलेला होता. पण आता त्याच अदानी यांचे नाव घेऊन केरळममधील काँग्रेस आपली पाठ थोपटून घेत असल्यामुळे लोकांनी त्यावर टीका केली आहे. एकीकडे राहुल गांधी हे अदानींच्या नावाने बोटे मोडत असताना तिकडे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री सतीशन हे मात्र अदानी यांचे नाव असलेला झेंडा दाखवत असल्याबद्दल लोकांनी जाब विचारला.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला केंद्राचा ‘बूस्टर डोस’

विरोधकांचा अविश्वास; पण ट्रम्प यांचा भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भरवसा

इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवणार

सोरेन सरकार झुकलं; JSSC-CGLसह TDPLच्या परीक्षा रद्द

केरळची उत्पादने युरोप बाजारपेठेत

विझिंगममधून सुरू झालेल्या पहिल्या आयात-निर्यात मालवाहतुकीमध्ये केरळच्या पारंपरिक अन्नपदार्थ आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. हे उत्पादन युरोपियन बाजारपेठेकडे रवाना होणार आहे. विझिंजम बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता यांनी बंदराची क्षमता आणि तांत्रिक वैशिष्ट्ये अधोरेखित केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा