33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणखट्टर यांचे निकटवर्तीय ते हरयाणाचे मुख्यमंत्री

खट्टर यांचे निकटवर्तीय ते हरयाणाचे मुख्यमंत्री

नायबसिंह सैनी यांचा उत्कंठावर्धक राजकीय प्रवास

Google News Follow

Related

सन १९६६ मध्ये स्थापन झालेल्या हरयाणा राज्याचे ११ वे मुख्यमंत्री होण्यासाठी ५४ वर्षीय नायबसिंह सैनी सज्ज झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यांनी सैनी यांना राजकारणात बोट धरून आणले त्याच मनोहरलाल खट्टर यांची जागा आता सैनी घेतील.

२५ जून १९७० रोजी अंबाला जिल्ह्यातील मिर्झापूर माजरा गावात जन्मलेल्या सैनी यांनी मुझफ्फरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून बीएची पदवी तर, मेरठमधील चौधरी चरणसिंह विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहे. त्यांचे सन १९९६पासूनच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होते. संघटनेत हळूहळू एकेक पदे मिळवत सन २००२मध्ये त्यांची भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. तसेच, त्याचवेळी त्याच युनिटचे अध्यक्ष म्हणून ते नियुक्त झाले.

सन २००९मध्ये सैनी यांनी त्यांची पहिलीवहिली निवडणूक नारायणगड मतदारसंघातून लढवली. ही जागा भाजपने कधीही जिंकली नव्हती. तेव्हा त्यांना पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती. काँग्रेसचे राम किशन तेव्हा विजयी झाले होते. तर, सैनी यांना अवघा ६.८६ टक्के मते मिळाली होती. अवघ्या पाच वर्षांत हरयाणात भाजप सत्तास्थानी पोहोचली आणि याच मतदारसंघातून तब्बल ३९.७६ टक्के मते मिळवण्याची किमया त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी विद्यमान आमदार राम किशन यांचा २४ हजार मतांनी पराभव केला.

सन २०१४ ते २०१९ या कार्यकाळात त्यांनी खट्टर मंत्रिमंडळात मजूर आणि रोजगार आणि खाण व भूगर्भ खात्याचा कारभार पाहिला. त्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पाय ठेवला. तिथेही त्यांनी तब्बल चार लाख मतांनी विजय संपादन केला. त्यानंतर त्यांचे महत्त्व राज्यात वाढले. २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी राज्यातील मोठे नेते ओम धनकर यांच्या जागी राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सैनी यांची नियुक्ती करण्यात आली.

जाट समुदायाचे वर्चस्व राहिलेल्या या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सातत्याने बिगर जाट समुदायाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सुरुवातीला पंजाबी असलेले खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांनी शक्तिशाली जाट नेते धनखड यांना हटवून प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी असणाऱ्या सैनी यांची नियुक्ती केली आणि आता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. ‘जाट समुदाय हा काँग्रेस, जननायक जनता पक्ष (जेजेपी) आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल यात विभागलेला दिसतो,’ असे भाजपच्या नेत्याने सांगितले.

नवे मुख्यमंत्री ज्या समाजातून आहेत, त्या सैनी समाजाची लोकसंख्या हरयाणात आठ टक्के आहे. परंतु राज्यातील ओबीसींची लोकसंख्या २८.६ टक्के आहे. उत्तर हरयाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, हिसार आणि रेवडी भागात सैनी समाजाचे प्रभुत्व आहे. ‘सैनी यांची निवड करून भाजपने योग्य निर्णय घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच अंबालाचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे या भागात आम्हाला मदत होईल,’ असे अंबालाचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष राजेश बतौरा सांगतात.

विशेष म्हणजे सैनी हे ६९ वर्षीय मनोहरलाल खट्टर यांचे निकटवर्तीय मानले जातात. सैनी हे पक्षात तीन दशकांपासून कार्यरत असले तरी त्यांची कारकीर्द खट्टर यांचे सहकारी म्हणूनच सुरू झाली. ‘९०च्या दशकात जेव्हा खट्टर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा पक्षाचे काम करायचे, तेव्हा सैनी हे खट्टर यांची गाडी चालवत असत. ते सदैव खट्टर यांच्यासोबत असायचे आणि ते त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन जाण्यापर्यंत सगळी कामे करायचे. त्यांचा स्वभावही विनम्र होता,’ असे एका भाजप नेत्याने सांगितले. सन २०१४मध्ये खट्टर यांनी पहिल्यांदाच विजयी झालेल्या सैनी यांना हरयाणात कॅबिनेट मंत्रिपद दिले होते, हे विशेष. तसेच, खासदार झाल्यानंतर त्यांना राज्याच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते.

हे ही वाचा:

देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!

लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!

उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता

सन २०१६मध्ये झालेले जाट आंदोलन आणि सन २०१७मध्ये बाबा रहिम याला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर हरयाणात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाविरोधात रोष उत्पन्न होऊ नये, म्हणून हा खांदेपालट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा