34 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरराजकारणग्रामपंचायत निवडणुकीत उघडले ‘आप’ चे खाते!

ग्रामपंचायत निवडणुकीत उघडले ‘आप’ चे खाते!

Google News Follow

Related

दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातही आपले खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ गावातील ग्रामपंचायतीत सात पैकी पाच जागा जिंकत आम आदमी पक्षाने विजयाचा गुलाल लावला आहे. आम आदमी पक्षाचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने हा करिष्मा करून दाखवला आहे.

१५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतींचे मतदान झाले. राज्यातील तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या या मतदानात लाखो नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी आज १८ जानेवारी रोजी होत असून सर्वच पक्षांनी या निवडणुकीत आपलीच सरशी झाल्याचा दावा केला आहे. आम आदमी पक्षानेही आपले नशीब आजमावण्यासाठी आपले उमेद्वार उभे केले असून लातूर जिल्ह्यात त्यांना यश आले आहे.

आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून केजरीवालांनी या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.” असे थेट मराठी भाषेतले ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा