27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरराजकारणकोस्टल रोड ठरतोय 'कॉस्टली'; शेलारांकडून घोटाळ्याचा आरोप

कोस्टल रोड ठरतोय ‘कॉस्टली’; शेलारांकडून घोटाळ्याचा आरोप

Related

कोस्टल रोड प्रकल्पात सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० या काळात सुमारे एक हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० पर्यंतच्या सर्व कोस्टल रोडच्या कामांच्या गतीविधींवर आम्ही पाळत ठेवून होतो. कोस्टल रोडच्या तिन्ही पॅकेजमधील कामात मिळून १ हजार कोटी रुपये सामान्य मुंबईकरांचे गेले, असे आशिष शेलार म्हणाले.

कोस्टल रोडच्या टप्पा एकमधील भराव कामासाठी लागणारा दगड आणि साहित्य हे शासनाच्या परवानाधारक खाणीतून न उचलता ते अन्य ठिकाणाहून उचलण्यात आल्याने सदर कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीतून मिळणाऱ्या ४३७ कोटी रुपयांची अफरातफर केली आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. भरावासाठी निविदेमध्ये नमूद केलेल्या अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करून महापालिकेकडून अतिरिक्त ४८.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. हे महापालिकेचे नुकसान का करण्यात आले, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान

एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

कोस्टल रोड कंत्राटदाराने भाराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे ८१.२२ कोटी रुपये भरण्यात आलेला नाही. हा दंड माफ करून यात कोणी कमिशनसाठी षडयंत्र रचत आहे का, असाही सवाल आशिष शेलार यांनी केला. ३५ हजार बोगस फेऱ्या दाखवल्याची माहिती आमच्याकडे आहे. कंत्राटदारांनी पुरवलेल्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वादळांमध्ये वाहून गेले. ते नुकसान महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आले का, साहित्यामुळे महानगरपालिकेचे १७.८६ कोटींचे नुकसान का करण्यात आले, हा भुर्दंड पालिकेला का, असे सवाल आशिष शेलार यांनी कोस्टल रोड प्रकरणात उपस्थित केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा