31 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरविशेषभारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

Related

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. ओव्हल येथे खेळाल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना खिशात टाकत भारताने ही महत्वपूर्ण आघाडी मिळवली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताच्या या विजयामुळे मालिका विजयाच्या भारताच्या आशा आणखीन वाढल्या आहेत. तर ही मालिका जिंकणे इंग्लंडसाठी अशक्य झाले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत शेवटचा सामना जर इंग्लंड जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल पण तसे न झाल्यास भारत या मालिकेवर आपले नाव कोरले.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा पाचवा दिवस फारच महत्त्वपूर्ण ठरला. ३६८ धावांचे विजयी लक्ष्य असलेला इंग्लंड संघ सुरुवातीला सुस्थितीत दिसत होता. चौथ्या दिवसा अखेरीस खेळायला आलेल्या इंग्लंड संघाने एकही विकेट गमावली नव्हती. हाच सिलसिला पाचव्या दिवशीही सुरुवातीचा काही काळ राहिला. इंग्लंडच्या सलामीवीर बर्न्स आणि हमीद यांनी शतकी भागीदारी करून इंग्लंडचा पाया भक्कम केला होता. या दोघांनीही अर्धशतक झळकावले. पण बर्न्सचे अर्धशतक पूर्ण झाल्या झाल्या शार्दुल ठाकुरने एका अप्रतिम चेंडूवर त्याला बाद केले. तर त्यानंतर खेळायला आलेला मलान हा देखील लगेचच धावबाद झाला. लागोपाठ पडलेल्या या दोन विकेट्समुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या.

हे ही वाचा:

गाडी पुण्यात; दंड मुंबईत!

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज

गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या

उपाहारानंतर जेव्हा दोन्ही संघ पुन्हा मैदानावर उतरले तेव्हा सुरुवातीला सेट झालेल्या सलामीवीर हमीदला जडेजाने बाद केले. त्यानंतर बुमराहने ओली पॉप आणि बेरस्टोचा काटा काढला. तर चिवटपणे खेळणाऱ्या कर्णधार जो रूटचा त्रिफळा शार्दुल ठाकूरने उडवला. त्यानंतर मोईन आली खेळण्यासाठी मैदानावर उतरला. पण त्याला देखील रवींद्र जडेजाने शून्यात बाद केले.

पुढे एकट्या उमेश यादवने इंग्लंडच्या उर्वरित तीन फलंदाजांना बाद केले आणि भारताच्या विजयावर शिक्का मारला. ओव्हल मैदानावरचा हा विजय एका वरच्या दर्जाच्या कसोटी क्रिकेटचे उदाहरण ठरले. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला त्याच्या दुसऱ्या डावातील १२७ धावांच्या महत्वपूर्ण शतकी खेळीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

या मालिकेतील अखेरचा सामना मँचेस्टर इथल्या ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. शुक्रवार,१० सप्टेंबर ते मंगळवार, १४ सप्टेंबर या कालावधीत हा सामना खेळला जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा