28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरदेश दुनियापंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान

पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान

Related

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतात नॅशनल रजिस्टंट फ्रंट तालिबानला कडवी झूंज देतेय. तालिबानसोबतच्या युद्धात एनआरएफने पाकिस्तानचं फायटर जेट विमान पाडल्याचा दावा एनआरएफचे नेते अहमद मसूद यांनी केलाय. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं, “पाकिस्तानचं जेट प्लेन पंजशीरमध्ये पाडण्यात आलंय. रेजिस्टंस पंजशीर.” या ट्विटसोबत मसूद यांनी या फायटर जेट प्लेनचा फोटोही जोडला आहे. फोटोत हे विमान जमिनीवर पडलेलं दिसत आहे. याआधी पाकिस्तानने पंजशीरमध्ये ड्रोनने हल्ला केल्याचं वृत्त होतं.

तालिबानने पंजशीर प्रांत सोडला तर संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. मात्र, पंजशीरमधील स्थानिकांनी नागरिकांना प्रक्षिक्षण देत सैन्य उभं केलंय. हे स्थानिक सैन्य तालिबानला कडवी झुंज देतंय. तालिबानकडून वारंवार पंजशीरवर हल्ले चढवून पंजशीरचा ताबा घेण्याचा प्रयत्न होतोय. पाकिस्तानने तालिबानला मदत करत पंजशीरवर ड्रोन्स हल्ले केल्याचाही आरोप झाला होता. मात्र, आता एनआरएफने थेट फायटर विमान पाडल्याचाच फोटो पोस्ट करुन आपल्या दाव्याला बळ दिलंय.

स्थानिक वृत्तपत्रांनुसार पंजशीरवरील हे ड्रोन हल्ले रविवारी (५ सप्टेंबर) झाले होते. रजिस्टंस फ्रंटच्या नेत्यांच्या हवाल्यानं दिलेलं हे वृत्त तालिबानने मात्र फेटाळलं आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी तालिबान नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यावरुनच पाकिस्तान तालिबानची मदत करत असल्याचा आरोप होतोय.

हे ही वाचा:

एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या

अहमद मसूद यांनी फेसबूकवर एक ऑडिओ क्लिप जारी करत तालिबानचे दावे खोटे असल्याचं म्हटलंय. तसेच अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केल्यावरुन पाकिस्तानला लाथाडलं आहे. ते म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि सहकारी फहीम दश्ती यांना मारण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत केलीय. पाकिस्तानसोबत तालिबान संगनमत करत असल्याचं समजूनही संपूर्ण देश गप्प आहे. पाकिस्तान थेटपणे पंजशीरमध्ये अफगाणी नागरिकांवर हल्ला करत आहे. असं असताना आंतरराष्ट्रीय समूह शांतपणे हे पाहत आहे. तालिबान पाकिस्तानच्या मदतीने हल्ला करत आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा