39 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरराजकारणआता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी

आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी

Google News Follow

Related

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज, २६ जून रोजी सांताक्रूझ येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार इशारे दिल्यानंतर आता आदित्य ठाकरेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं की, फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

तिथे गेलेले १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे खातं असतं ते खातं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मग त्यांना कमी काय केलं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.

“मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा. उद्धव ठाकरे यांच्या समोरही बसण्याची गरज नाही. आम्ही काहीही करणार नाही, हाताची घडी, तोंडावर बोट. तेव्हा मी डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे की काय कमी केलं तुम्हाला? कोणाच्या नावावर निवडून आले आहात तुम्ही?” असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार. आसाममध्ये एकीकडे पूर आला आहे. तिथे लोकांना संरक्षण द्यायला हवे होते. पण हे संरक्षण बंडखोरांना दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. असती तर तुम्ही बंड करुन सूरतला गेला असता का असेही ते म्हणाले. खरोखर यांच्यात ताकद, स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केलं असतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

हे ही वाचा:

बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे कडे

… म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के देणार राजीनामा

भगतसिंह कोश्यारींना डिस्चार्ज मिळणार; राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता

संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत एका शेतकऱ्यानं मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोललो. त्यानंतर संदीपान भुमरे यांना मंत्रीपद मिळालं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. त्यांना निवडणुकीत पाडणार. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा