28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरराजकारणअफगाणिस्तामधील अन्नाचा साठा महिन्याभरापुरता

अफगाणिस्तामधील अन्नाचा साठा महिन्याभरापुरता

Related

अफगाणिस्तानमध्ये सध्याच्या घडीला तालिबानने ताबा मिळवलेला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यानंतर, देशावर अनेक संकटे घोंघावू लागलेली आहेत.

सध्या अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्याचा साठा या महिन्यात संपुष्टात येऊ शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळेच आता अफगाणिस्तानावर येत्या काही काळामध्ये उपासमारीचे संकट येणार आहे. अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवतावादी प्रमुख रमीझ अलकबरोव यांच्या म्हणण्यानुसार, देशाच्या ३८ दशलक्ष लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना दररोज जेवण मिळेल की नाही हे माहित नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमामार्फत अलिकडच्या आठवड्यात अन्नाचा साठा हजारो लोकांना वितरित केला. परंतु आता हिवाळा जवळ येत आहे आणि दुष्काळही चालू आहे. त्यामुळे अन्नसाठा रसद जमविण्यासाठी कमीतकमी २०० दशलक्ष डॉलर्सची गरज आहे. हे डॅलर्स मिळाले तरच अफगाण नागरिक सुरक्षितपणे जगू शकणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस देशातील अन्नसाठा हा संपणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. याआधी, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण मदत प्रयत्नांसाठी आवश्यक असलेल्या १.३ अब्ज डॉलर्सपैकी फक्त ३९ टक्के रक्कम मिळाली आहे.

हे ही वाचा:

भारताला असा होऊ शकतो तालिबानचा फायदा

रिलायन्सची ७५ कोटींची गुंतवणूक

थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत निवडणुका नकोत

अन्न पुरवठ्याबद्दलच्या चिंतेव्यतिरिक्त, सरकारी कर्मचार्‍यांना त्यांचे वेतनही दिले गेले नाही. त्यामुळे आता स्थानिक चलनाचा चांगलाच तुटवडा भासू लागलेला आहे. अफगाणिस्तानचा बहुतांशी पैसा हा बाहेर आहे, परंतु सध्याच्या घडीला हा साठा पूर्णपणे गोठलेला आहे. अफगाणिस्तानचे माजी कार्यवाह अर्थमंत्री खालिद पायेंदा यांनी अफगाणिस्तानातील एकूणच धोकादायक स्थितीची माहिती दिली. वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन विद्यापीठात बोलताना पायेंडा म्हणाले की, अफगाणिस्तानचे चलन अजून क्रॅश होणे बाकी आहे. कारण मनी एक्सचेंजेस बंद होते. पण त्याचे मूल्य १०० टक्क्यांपेक्षा जास्त घसरू शकते, असेही पायेंडा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा