26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणअजित पवारांनी पुन्हा केली शरद पवारांची पोलखोल

अजित पवारांनी पुन्हा केली शरद पवारांची पोलखोल

राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं, अजित पवारांचा खळबळजनक आरोप

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास चार महिने उलटले असून अजित पवारांनी कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे.

“आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही काहीजण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल म्हणून सुप्रियाला तिथे बोलवून घेतलं. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते, असं समजावलं. सगळं ऐकल्यानंतर तिने सांगितलं की, मला सात ते दहा दिवस द्या. मी शरद पवारांना राजी करते. आम्ही १० दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते,” असा दावा करत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला.

शिवाय सुप्रिया सुळेंना दिलेली मुदत उलटल्यानंतर थेट शरद पवारांना सगळं सांगितल्याचंही अजित पवार म्हणाले. शरद पवारांना सांगितल्यावर त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि ते ठीक आहे, असंही म्हणाले. काय करायचं तेही बघू. नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला चर्चा देखील केली. वेळ निघून जात आहे आणि लवकर काय तो निर्णय घ्यावा, असं शरद पवारांना सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच शरद पवार राजीनामा देणार असल्याचे ठरले होते. “१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. १५ लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली”, असं सांगत अजित पवारांनी आणखी एक गौप्यस्फोट केला.

“आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही महिला आणि युवक पाहिजे. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. हे त्यांचे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. नंतर हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. जितेंद्र आव्हाड सोडले तर एकही आमदार नव्हते. मला एक सांगतायत, तिथे एक सांगतायत,” असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला.

“त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला गेला. आम्हाला सांगितलं की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणं बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा. एक घाव दोन तुकडे, विषय संपला,” असं भाष्य अजित पवारांनी केलं.

“आम्ही २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवलं? आम्हाला सांगितलं की आधी मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदार या. तिसऱ्या दिवशी शरद पवारांबरोबर राहिलेल्या लोकांबरोबर चर्चा होणार होती. पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं. यात वेळ गेला आणि तटकरे म्हणायचे आम्हाला लवकर सांगा, आम्हाला पुढे जायचंय. रुपाली चाकणकरांनी काही बोललं की सांगायचे की तू तसं काही म्हणू नको असं सांगितलं जायचं. सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे. तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का?” असा तिखट सवाल अजित पवारांनी केला.

१२ ऑगस्ट रोजी शरद पवार आणि अजित पवारांची एका उद्योगपतींच्या घरी भेट झाल्याचे वृत्त होते. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. “१२ ऑगस्टला एका उद्योगपतीकडे बोलवलं. शरद पवार, जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचं. निरोप आल्यानंतर मी गेलो. आमच्या निर्णयानंतर जवळपास दीड महिना उलटला होता. जर करायचंच नव्हतं तर कशासाठी हे सगळं केलं. कुणासाठी करता? आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच करतो ना? आम्ही चांगलं सरकार चालवू शकत नाही का? मागे अडीच वर्षांत कोण काय करत होतं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनामा मागे घेण्याची मागणी होऊ लागली. यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. यासंदर्भात अजित पवारांनी शिबिरात बोलताना सविस्तर भाष्य केलं आणि खळबळजनक गौप्यस्फोट केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा