31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारण"पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध"

“पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध”

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावले

Google News Follow

Related

भारतात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना एकीकडे अनेक नेत्यांकडून पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेबद्दल विधाने केली जात आहेत. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य करत म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतात परत आला पाहिजे. बुधवारी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये बोलताना एस जयशंकर यांनी ‘विश्व बंधू भारत’ या विषयावरील चर्चेदरम्यान आपले मत व्यक्त केले.

एस जयशंकर म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतात परत आला पाहिजे. यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असून संसदेचा प्रस्ताव आहे आणि सर्व राजकीय पक्ष यासाठी वचनबद्ध आहेत. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी कलम ३७० चाही उल्लेख केला आणि वर्षानुवर्षे पडलेल्या प्रश्नाचे उत्तरही सापडल्याचे सांगितले.

एस जयशंकर म्हणाले की, लोकांनी हे मान्य केले होते की, कलम ३७० हटवता येणार नाही पण आम्ही ते बदलले आणि वास्तव बदलले. पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेचा असाच ठराव असल्याचे ते म्हणाले. आम्ही ३७० रद्द केले त्यामुळे आता लोकांना पीओकेचे देखील महत्त्व समजले आहे.

हे ही वाचा:

करकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!

‘महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका तारखा जाहीर’

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!

यापूर्वी, एका मुलाखतीत एस जयशंकर म्हणाले होते की, पीओके हा भारताचा भाग आहे. आम्ही त्या भागावर इतर कोणाचे नियंत्रण स्वीकारू शकत नाही. देशात आता बदल झाला आहे. गेल्या दहा वर्षांत देशाचा स्वतःबद्दलचा विचार बदलला आहे. आमचा दृष्टिकोन जगासमोर ठेवायला आम्ही आता घाबरत नाही. देशाच्या प्रत्येक भागात असलेले वातावरण पाहता एक प्रकारे आपण काळासोबत वाटचाल करत आहोत, असे म्हणता येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा