29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरराजकारण“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”

“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”

अमरावतीमधील सभेतून अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना वेग आला असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अमरावती लोकसभा मतदार संघाच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधक आणि कॉंग्रेसवर निशाणा साधत नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील निर्णयांचे कौतुक केले. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही निशाणा साधला.

नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत

“नवनीत राणांना दिलेलं प्रत्येक मत नरेंद्र मोदींना असणार आहे. देशाला दहशतवाद, नक्षलवाद मुक्तीकडे नेणारे हे मत असणार आहे. काँग्रेसने ७० वर्षे राम मंदिराचा मुद्दा रखडवून ठेवला. उद्धव ठाकरेंना राममंदिर प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण दिलं. शिवाय शरद पवारांना, राहुल गांधींनाही निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत. शरद पवार यांनीही तब्येतीचे कारण देत हजेरी लावली नाही. पण, आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत. राहुल गांधीही अयोध्येतील सोहळ्याला आले नाहीत. आज ते अमरावतीत सभेला आले होते. पण, त्यांना ऐकायला कोणच नव्हते. आधी त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे. तरच तुम्हाला देशात ऐकायला लोक येतील,” असा टोला अमित शाह यांनी लगावला.

शरद पवारांनी १० वर्षे कृषीमंत्री असताना काय केले?

नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांनी माफी मागितली होती. यावर अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांची माफी मागा, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. १० वर्षे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांना म्हटलं आहे.

कलम ३७० सांभाळण्याचे काम काँग्रेसने केले

“अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्राने संकल्प करायचा आहे की, प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे. काश्मीर आपलं आहे की नाही आहे? मल्लिकार्जुन खरगे म्हणतात राजस्थान आणि महाराष्ट्राचे काश्मीरशी काय देणेघेणे? पण नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून काश्मिरला कायमचा देशाचा हिस्सा बनवलं आहे. कलम ३७० ला सांभाळण्याचे काम काँग्रेसने केले. आपल्या देशाशी नडणाऱ्या पाकिस्तानमध्ये जात नरेंद्र मोदींच्या सरकारने एअर स्ट्राईक केले,” असे अमित शाह विरोधकांवर टीका करताना म्हणाले.

“भाजपाला ४०० जागा मिळवून संविधान बदलावायचं आहे असा अपप्रचार करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. पण, जर असेच आम्हाला करायचे असेल तर आमच्याकडे २०१४ पासून पूर्ण बहूमत आहे. तेव्हाच हे सगळं केलं असतं. पण, आम्ही याचा उपयोग करत ३७० हटवणं, ट्रिपल तलाकला बंदी असे महत्त्वाचे निर्णय घेतले,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!

‘सरकार गेल्याने उबाठा भ्रमिष्ट आणि सैरभैर’

निर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात

जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे संस्कार सोडले

“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे संस्कार पुढे घेऊन जात आहेत. राज्यात महायुती सरकार आहे आता कोणत्याही उमेश कोल्हेची हत्या होणार नाही. नवनीत राणा यांच्या नावासोरील कमळाचं बटण दाबा, इतकं जोरात बटण दाबा की बटण अमरावतीमध्ये दाबाल करंट इटलीमध्ये बसेल,” असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा