28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरराजकारणचंद्राबाबू नायडू १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत

चंद्राबाबू नायडू १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत

तब्बल ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळ्यातील महत्त्वाचे सूत्रधार?

Google News Follow

Related

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

 

तब्बल ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळ्यातील महत्त्वाचे सूत्रधार असल्याच्या आरोपावरून गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना शनिवारी अटक केली होती. हे प्रकरण सन २०१४मधील आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे. बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे आणि अनंतपूर जिल्ह्यातील किआ सारख्या उद्योगांजवळील शैक्षणिक संस्थांशी संबंध वाढवणे हा या महामंडळाचा उद्देश होता. चंद्राबाबू नायडू यांनी या महामंडळाच्या नावाखाली ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

हे ही वाचा:

शाहीन आफ्रिदीने ज्युनिअर बुमराहला दिली खास भेट!

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

काँग्रेस खासदार शशी थरूर यांची मोदी सरकारवर स्तुतिसुमने

वेंकटेश प्रसादने झुबेरला झापले, पण काँग्रेस प्रवक्त्यांचे पित्त खवळले

 

चंद्राबाबू नायडू हे सन २०१४ ते सन २०१९पर्यंत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असताना, आंध्र प्रदेश सरकारने या महामंडळासाठी जर्मन अभियांत्रिकी कंपनी सिमेन्ससोबत भागीदारी केली. सीमेन्सला सहा उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन करण्याचे काम देण्यात आले होते. तथापि, सीमेन्सने या प्रकल्पात कोणताही निधी गुंतवला नसतानाही राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ३७१ कोटी रुपये जारी केले. या प्रकरणी नायडू यांना भारतीय दंडसंहितेच्या कलम १२०बी ( गुन्हेगारी कट), ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि ४६५ (बनावटगिरी) या कलमांखाली अटक करण्यात आली. आंध्र प्रदेश सीआयडीने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.

 

चंद्राबाबू नायडू हे तपासात सहकार्य करत नसल्याचे तसेच, त्यांना काही मुद्द्यांबाबत विचारणा केली असता, ते आठवत नाही, असे त्रोटक उत्तर देत असल्याचे सीआयडीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा