31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारण'मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार'

‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’

मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील आणि विकसित मुंबई, मुंबईकरांना सुपूर्त करायची असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

Google News Follow

Related

मुंबईच्या भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्त करण्यात आली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आता शिवसेनेचा सामना थेट माझ्याशी असल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तसेच आगामी मुंबई महापालिकेची निवडणूकही आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत भ्रष्टचार होतोय, त्या भ्रष्टाचारापासून मुंबईकरांना मुक्त करायचं आहे. मुंबईत केलेल्या भ्रष्टाचारापासून शिवसेना पळ काढू शकत नाही. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल. मुंबईला मी भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचं शेलार म्हणाले आहेत.

शाळेतील संगणक खरेदी पासून सगळ्या विषयांवर महापालिकेतील आमचे सगळे सहकारी नेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो, जे गेल्या २५ वर्षात तुमच्या मनामध्ये होते, जे चित्र तुमच्या मनात डोक्यात तुम्ही रंगवलं होता ते चित्र संपूर्णपणे साकारण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करेल. यासाठी आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील असंही शेलार म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, आमचं ठरलं आहे, भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील आणि विकसित मुंबई, मुंबईकरांना सुपूर्त करायची असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन

काँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक

शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? उदयन राजे कडाडले

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामध्ये मुंबईचे यापूर्वीचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा होते. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने या पदावर भाजपा नेते आशिष शेलार यांची निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा