25 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरराजकारणमहाविकास आघाडीने बनवले महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी 

महाविकास आघाडीने बनवले महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी 

Google News Follow

Related

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केलं आहे. राज्यात दोन महिन्यात ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहते. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे, अशी टीका भाजपचे आमदार माजी मंत्री एड. आशिष शेलार यांनी केली. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सकारवर टीका करताना ते म्हणाले, सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला लोकांच्या हिताशी काही देणे-घेणे नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यू दर गेल्या दोन महिन्यांत ५५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्याला देशात करोनाची राजधानी बनवले. केंद्र सरकारने दिलेल्या लशी लोकांना देण्यात नियोजन न झाल्यान हेे केंद्र सरकारला दोष देतात. हे दुटप्पी सरकार आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडल पाहिजे. ठाकरे सरकारची वृत्ती रक्त पिपासूसारखी आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगस बियाणे, पीक विमा अशा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे आमदार शेलार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सरकारी वकिलांना योग्य माहिती दिली नाही. सहकार्य केले नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या असहकार्याबद्दल भाष्य केले होते. यातून राज्य सरकारचा मराठा आरक्षणाविरोधातील कुटील डाव स्पष्ट होतो, असे शेलार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत हीच परिस्थिती आहे केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम केले जाते. जनतेमध्ये संभ्रम पसरवला जातो.

हे ही वाचा:

पालिकेपेक्षा खासगी लसीकरण सुदृढ अवस्थेत

फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

पाळत आणि भातुकलीचा खेळ!

आमदार आशीष शेलार पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी सांगली शहर व ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या. खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक आदी सहभागी झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा