20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरराजकारणरणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

Related

मंगळवार, २८ डिसेंबर रोजी एकीकडे विधिमंडळात राजकारण तापलेले असतानाच सभागृहाच्या बाहेर समाज माध्यमांवरही सरकार विरोधात फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकार विरोधात चांगलीच टोलेबाजी केलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवत घरी राहण्याच्या घटनेवरून भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “रणझुंजारच्या धर्तीवर घरझुंजार असा नवा शब्दही पाडता येईल” असा सणसणीत टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर हे पक्षाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. भातखळकर हे समाज माध्यमांवरही चांगलेच सक्रिय असतात. पण पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या १२ आमदारांमध्ये भातखळकर यांचा समावेश असल्यामुळे ते हिवाळी अधिवेशनाला उपस्थित नव्हते. तरी देखील भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’

भारतातील विमानतळांवर वाजणार ‘आपले’ संगीत

पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले

अतुल भातखळकर यांनी मंगळवारी लागोपाठ चार ट्विट करत सरकारवर तोफ डागली आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “महाराष्ट्रात कायम घरात बसून ब्रह्मांड नियंत्रित करण्याचा इतिहास घडतोय…” तर पुढे ते म्हणतात, ” घरीच अधिवेशन भरवलं असतं तर?? नियंत्रित करणे सोपं गेलं असतं…”

त्यांनतर “विधिमंडळ बनाउंगा, तेरे घर के सामने, अधिवेशन भराउंगा, तेरे घर के सामने…” असे म्हणत त्यांनी विडंबनातून सरकारला झोडपले आहे. तर सर्वात शेवटी “रणझुंजार च्या धर्तीवर आता घरझुंजार असा नवा शब्दही पाडता येईल…” असा सणसणीत वार भातखाळकरांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा