27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारणलवकरच आझमगडचे होणार आर्यमगड

लवकरच आझमगडचे होणार आर्यमगड

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगडचे नाव बदलून ‘आर्यमगड’ करणार असल्याचे संकेत दिले आहेत. योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आझमगडमध्ये एका सभेला संबोधित करत होते.

“ज्या विद्यापीठाची आज पायाभरणी झाली आहे. ते आझमगडला खऱ्या अर्थाने आर्यमगड बनवेल, यात आता शंका नाही.” योगी आदित्यनाथ यांनी विद्यापीठाची पायाभरणी करताना दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

“जिना, आझम खान आणि मुख्तार (अन्सारी)” हे (JAM) असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचल प्रदेशाला “मच्छर आणि माफियांपासून” मुक्त केले आहे. असे सांगितले.

“भाजपने लोकांना ‘JAM’ – जनधन, आधार आणि मोबाईल दिला- पण सपाचे लोक म्हणतात की त्यांनी ‘JAM’ – जिना, आझम खान आणि मुख्तार (डॉनमधून राजकारणी मुख्तार अन्सारी) आणले आहेत,” शाह एका सभेला संबोधित करताना म्हणाले. आझमगड हा सपाचा बालेकिल्ला आहे ज्याचे प्रतिनिधित्व पक्षप्रमुख अखिलेश यादव लोकसभेत करतात.

हे ही वाचा:

…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

“तुम्ही मला सांगा की तुम्हाला भाजपचा JAM हवा आहे की सपाचा JAM. हे लोक कधीच उत्तर प्रदेशच्या हितासाठी काम करू शकत नाहीत. ते जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडून दंगली, तुष्टीकरण आणि व्होटबँकेचे राजकारण करतात.” असं शहा म्हणाले. .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा