32 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरराजकारणतरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा

तरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा

१७ सप्टेंबरपासून विशेष उपक्रम राबवण्याची तयारी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी देशातील तरुणांशी संवाद अधिक मजबूत करण्यासाठी पक्षातील ४५ निवडक युवा नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत तरुणांच्या बदलत्या अपेक्षा, त्यांच्या अडचणी आणि राजकीय-सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, सर्व तरुणांना एकाच चौकटीत न पाहता त्यांच्या वयोगट, पार्श्वभूमी आणि गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याची गरज नेत्यांनी व्यक्त केली. ‘जेन-झेड’ या एका व्यापक वर्गीकरणाऐवजी तरुणांच्या विविध गटांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत भाजप नेत्यांनी केवळ तरुणांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही तरुणांमध्ये जाताना फक्त पक्षाची भूमिका मांडण्याऐवजी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मतं समजून घेण्यावर भर दिला. त्याचवेळी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे आणि पारंपरिक समर्थकांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली. युवा संवाद वाढवतानाच जुन्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वावरील विश्वास कायम ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

हे ही वाचा:
एचडीएफसी बँकेला मोठा धक्का; सीईओ शशीधर जगदीशन पदावरून पायउतार होणार

पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

एव्हरेस्ट, लालजी गोधू हिंगावर बंदी

या ४५ नेत्यांचे पाच-सहा गट तयार करण्यात आले असून गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांच्यासह काही नेत्यांकडे टीम लीडर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक गटातील नेते पुढील काही दिवसांत आपल्या सूचना टीम लीडरकडे पाठवणार असून त्या एकत्रित करून पक्षाच्या आगामी कार्यक्रमांमध्ये त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १० सप्टेंबरपूर्वी सूचना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा संकल्प महोत्सवा’दरम्यान तरुणांना जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

या बैठकीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, कमलेश पासवान, रक्षा खडसे यांच्यासह गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा, स्मृती इराणी, रवि किशन, तेजस्वी सूर्या, पूनम महाजन, पंकजा मुंडे, बांसुरी स्वराज, सुधांशु त्रिवेदी आणि संदीप पाठक यांसारखे नेते उपस्थित होते. आगामी काळात तरुणांशी थेट आणि सातत्यपूर्ण संवाद वाढवून त्यांचा सहभाग मजबूत करण्याची भाजपची रणनीती असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा