28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरधर्म संस्कृतीकर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा संदेश

कर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा संदेश

भारतीय जीवनमूल्ये जगभर पोहोचवण्याचं आवाहन

Google News Follow

Related

न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनिवासी भारतीयांना कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्हींबाबत महत्त्वाचा संदेश दिला. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’च्या वतीने आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपण ज्या देशात राहतो, काम करतो आणि कमावतो, त्या देशाशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

“अमेरिकेत राहतो, अमेरिकेत कमावतो, त्यामुळे अमेरिकेशी प्रामाणिक राहिले पाहिजे,” असे सांगत भागवत यांनी कर्मभूमीप्रती निष्ठा ठेवण्यावर भर दिला. भारत ही आपली जन्मभूमी असल्याने भारताशी असलेले नातेही कायम जपले पाहिजे. मात्र भारताची अपेक्षा परदेशातील भारतीयांनी आपली कर्मभूमी सोडून भारतासाठी काम करावे, अशी नाही. उपलब्ध वेळ, साधने आणि क्षमतेनुसार भारतासाठी योगदान देता येईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
तरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा

एचडीएफसी बँकेला मोठा धक्का; सीईओ शशीधर जगदीशन पदावरून पायउतार होणार

पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

भारताने जगाला जगण्याचा एक विचार आणि जीवनमूल्ये दिली आहेत. त्यामुळे परदेशातील भारतीयांनी ही मूल्ये आपल्या आचरणातून पुढे न्यावीत, असा संदेशही भागवत यांनी दिला. कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्ही ठिकाणची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली, तर त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी जगासमोरील वाढत्या समस्यांकडेही लक्ष वेधले. सध्याच्या काळात जगाला मानसिक बळ, आधार आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल केले, तरी त्यातून शाश्वत जीवनपद्धती आणि व्यापक सामाजिक परिवर्तनाला हातभार लागू शकतो, असे भागवत म्हणाले. विविधतेत एकता हा भारताचा महत्त्वाचा विचार असून, तो जगाला दिशा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा