32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणभाजपा नेते आदित्य मिश्रांसह सहकाऱ्याचा अपघातात मृत्यू, तीन जखमी

भाजपा नेते आदित्य मिश्रांसह सहकाऱ्याचा अपघातात मृत्यू, तीन जखमी

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी जिल्हामंत्री आदित्य नारायण मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आदित्य यांच्यासोबत असलेले अशोक उर्फ चुचू पांडे यांचाही या अपघातात मृत्यू झाला झाला. त्याशिवाय भाजप नेते आदित्य यांचा मुलगा हर्षित, अशोक यांचा मुलगा सचिन पांडे आणि गनर पुनीत तिवारी यांची प्रकृती चिंताजनक आहे.

आदित्य मिश्रा हे अशोक आणि मुलांसह डेहराडून, उत्तराखंड येथे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. लग्नाचा कायर्क्रम उरकून ते कारमधून परतत असताना बरेली येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की,आदित्य यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशोक यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे.

नैनी सडवा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य देवेश गिरी उर्फ ​​दिपू यांचा धाकटा भाऊ उत्कर्ष गिरी याच्या विवाहसोहळ्याला हे लोक गेले होते. समारंभानंतर सर्वजण हरिद्वारला गेले. येथून परतत असताना बरेलीच्या गौघी पुरा पोलीस स्टेशन परिसरात त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकावर आदळली.

भाजपाचे नेते आणि माजी जिल्हा मंत्री आदित्य मिश्रा यांनी अरैल ग्रामसभेतून एकदा प्रमुख आणि ब्लॉक प्रमुखपदासाठी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना कोणत्याही निवडणुकीत यश मिळाले नाही. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी करचना विधानसभेतून निवडणूक लढवली होती. भाजपा संघटनेत त्यांची चांगली पकड होती.

दरम्यान, आदित्य यांना अनेक लोक लड्डू गुरु म्हणूनही ओळखायचे. कारण ते हनुमान मंदिर बांधवा येथे ते दहा वर्षांहून अधिक काळ लाडूचे दुकान चालवत होते. २०१९ मध्ये झालेल्या कुंभ कार्यक्रमापूर्वी त्या मंदिराचे महंत नरेंद्र गिरी आणि अशोक यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांचे दुकान मंदिरातून हटवण्यात आले होते. त्यानंतर परेड ग्राऊंडवर तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील ते मुख्य आरोपी होते. याप्रकरणी त्यांना दहा महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता.

हे ही वाचा:

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नवाब मलिकांना दणका; अटकेपासून संरक्षण नाहीच

‘मातोश्री’ दर्शनासाठी राणा दाम्पत्य मुंबईत

महंत गिरी जे हनुमान मंदिराचे महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी नरेंद्र गिरीयांच्या आत्महत्या प्रकरणात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आदित्य नारायण मिश्रा यांचेही नाव आहे. महंतने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्याला २५ लाखांचे कर्ज दिल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी सीबीआयच्या पथकाने त्यांची चौकशीही केली होती, मात्र कोणतेही ठोस कारण न मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा