28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणशिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

Google News Follow

Related

‘शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली’ असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील भारतीय जनता युवा मोर्चाने केलेल्या ‘फटकारा मोर्चा’ नंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसेनेवर शेलार आणि चांगली तोफ डागली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोलिसांना सांगून आंदोलन करत होते. आंदोलन झाल्यावर अटक होऊन जात असतानाच शिवसेनेने लपत छपत पोलिसांच्या अडून एका महिलेवर वार केला. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली असे शेलार म्हणाले. तर सोनिया आणि वाड्रा जेव्हा आपले देव बनतात तेव्हा तेंडुलकर, साठे आणि आंबेरकर शिवसेनेचे दुश्मन होतात हे या ठिकाणी दिसले असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

हे ही वाचा :

ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

हिंमत असेल तर मैदानात या
यावेळी पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. भाजपा कार्यकर्त्यांवर लपुन करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आशिष शेलार यांनी केला. तर ‘हिम्मत असेल तर खुल्या मैदानात या! तुम्हाला चारी मुंड्या चित करायला भारतीय जनता पार्टी तयार आहे.’ असा हल्लाबोल शेलार यांनी केला आहे.

लातों के भूत बातों से नही मानते
भाजपाची महिला कार्यकर्ती अक्षता तेंडुलकर हिच्यावर अनेक शिवसैनिकांनी मिळून पोलिसांच्या अडून हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा करावा तितका निषेध कमी आहे असे शेलार म्हणाले. तर ‘लातों के भूत बातों से नही मानते’ अशी म्हण हिंदीत आहे. त्यामुळे यापुढे आता बात होणार नाही. शिवसेनेला समजेल अशाच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल. असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा